दिलासा ! बाधिताची वाढ नव्हे तर एकाची मात्र घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:33 AM2021-09-12T04:33:48+5:302021-09-12T04:33:48+5:30
फक्त एका बाधितावर आलेली जिल्ह्यातील संख्या आता बघता-बघता सातवर पोहोचली आहे. यामुळे जिल्हावासीय व आरोग्य विभागाच्या टेन्शनमध्ये भर पडली ...
फक्त एका बाधितावर आलेली जिल्ह्यातील संख्या आता बघता-बघता सातवर पोहोचली आहे. यामुळे जिल्हावासीय व आरोग्य विभागाच्या टेन्शनमध्ये भर पडली होती. सर्वत्र जेथे तिसऱ्या लाटेबाबत बोलले जात आहे तेथेच नियंत्रणात असलेल्या जिल्ह्यात हळुवार का असो ना मात्र बाधित वाढल्याने धोका दिसून येत होता. मात्र, शनिवारी (दि.११) जिल्ह्यात एकाही बाधिताची नोंद घेण्यात आली नसून उलट एक बाधिताने कोरोनावर मात केल्याने आठवर असलेली बाधितांची आता सात झाली आहे.
जिल्ह्यातील सहा तालुके सध्या कोरोनामुक्त असून अर्जुनी-मोरगाव तालुक्यात चार तर देवरी तालुक्यात सध्या तीन ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यामुळे आता या दोन तालुक्यांतील नागरिकांना जास्त खबरदारी घेण्याची गरज आहे. सध्या गणेशोत्सवाला सुरुवात झाली असून, पुढे सणावारांचे दिवस असल्याने नागरिकांची गर्दी होणार. मात्र, आपल्या जिल्ह्याला आता तिसऱ्या लाटेपासून मुक्त ठेवण्यासाठी जिल्हावासीयांनी अत्यधिक खबरदार राहण्याची गरज दिसून येत आहे.
------------------------------------
सहा रुग्ण घरीच अलगीकरणात
जिल्ह्यात शनिवारी एका रुग्णाने कोरोनावर मात केल्यानंतर आता ॲक्टिव्ह रूग्ण संख्या सात झाली आहे. यातील सहा रुग्ण घरीच अलगीकरणात आहेत. म्हणजेच, एक रुग्ण उपाचारात असायला पाहिजे. एकंदर स्थिती नियंत्रणात असली तरीही नागरिकांनी धोका पत्करण्यापेक्षा संयमाने घेणेच चांगले राहील.
----------------------------------
आता खबरदारी घेण्याची गरज
आता सणासुदीला सुरुवात झाली असल्याने नागरिकांनी गर्दी करण्यापेक्षा अधिकच खबरदारीने वागण्याची गरज आहे. तिसऱ्या लाटेबाबत बोलले जात असून, आपला जिल्हा आता सुरक्षित ठेवण्यासाठी नागरिकांनी नियमांचे करावे. तसेच लवकरात लवकर लसीकरण करवून स्वत:ला व परिवाराला सुरक्षित करावे.
- अशोक इंगळे
नगराध्यक्ष, गोंदिया.
---------------------------------
जिल्ह्यातील स्थिती नियंत्रणात असली तरी अतिरेक न करता नागरिकांनी संयमाने घेण्याची हीच खरी वेळ आहे. कोरोना नियमांचे पालन करूनच आपण आपल्या जिल्ह्यातून कोरोनाला घालवू शकतो. त्यामुळे आता जास्तीत जास्त खबरदारीने वागावे व आपले तसेच परिवारातील प्रत्येकच व्यक्तीचे लसीकरण करवून घ्यावे.
-भावना कदम
सदस्य, नगर परिषद गोंदिया
--------------------------------
सणासुदीत गर्दी वाढून हेच वातावरण कोरोनाला फोफावण्यासाठी पोषक ठरते. त्यामुळे आता नियंत्रणात असलेल्या जिल्ह्यात कोरोनाला पाय पसरू न देण्यासाठी प्रत्येकाने कोरोना नियमांचे पालन करण्याची खरी गरज आहे. शिवाय, प्रत्येकाने लसीचे दोन्ही डोस घ्यावे व कुटुंबीयांचेही लसीकरण लवकरात लवकर करवून घ्यावे.
- करण चव्हाण
मुख्याधिकारी, नगर परिषद, गोंदिया.