दिलासादायक। १५८० रूग्णांची कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2020 05:00 AM2020-09-20T05:00:00+5:302020-09-20T05:00:23+5:30
जिल्ह्यात कोरोनाने आपले पाय घट्ट केले असून आता झपाट्याने रूग्ण संख्या वाढू लागली आहे. परिणामी रूग्ण संख्या ४००० हजार पार गेली आहे तर सोबतच मृतांची संख्याही ५६ वर पोहचली आहे. यामुळे जिल्हावासी आता चांगलेच धास्तीत आले असून त्यांचे टेंशन वाढले आहे. विशेष म्हणजे, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव नियंत्रणात यावा यासाठी शहरासह आता जिल्हाभरात ठिकठिकाणी जनता कर्फ्यू पाळला जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : सप्टेंबर महिना जिल्हावासीयांसाठी टेंशन वाढविणारा ठरल्याचे दिसत आहे. या महिन्यात आतापर्यंत सर्वाधिक २६३६ नवीन कोरोना रूग्णांची भर पडली आहे. शिवाय तब्बल ३६ रूग्णांचा जीवही याच महिन्यात गेला आहे. असे असतानाही याच महिन्यात १५८० रूग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. यामुळे कोरोनावर मात करणाऱ्या कोविड योद्धांच्या माध्यमातून एक दिलासादायक आकडेवारीही याच महिन्यात आली आहे.
जिल्ह्यात कोरोनाने आपले पाय घट्ट केले असून आता झपाट्याने रूग्ण संख्या वाढू लागली आहे. परिणामी रूग्ण संख्या ४००० हजार पार गेली आहे तर सोबतच मृतांची संख्याही ५६ वर पोहचली आहे. यामुळे जिल्हावासी आता चांगलेच धास्तीत आले असून त्यांचे टेंशन वाढले आहे. विशेष म्हणजे, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव नियंत्रणात यावा यासाठी शहरासह आता जिल्हाभरात ठिकठिकाणी जनता कर्फ्यू पाळला जात आहे. असे असतानाही रूग्ण संख्या वाढतच चालली आहे. विशेष म्हणजे, आतापर्यंतच्या रूग्ण संख्येत ५० टक्के पेक्षा जास्त रूग्ण व मृतांचा आकडा हा फक्त सप्टेंबर महिन्यातील आहे.
सप्टेंबर महिन्यातील ही आकडेवारी बघितल्यास शुक्रवारपर्यंत (दि.१८) जिल्ह्यात तब्बल २६३६ कोरोना बाधित रूग्ण वाढले आहेत. तर सोबतच ३६ रूग्णांचा कोरोनाने जीव घेतला आहे. यामुळे सप्टेंबर महिना जिल्हावासीयांसाठी धोकादायक ठरला आहे. असे असतानाच मात्र सप्टेंबर महिन्यात आतापर्यंत तब्बल १५८० रूग्णांनी कोरोनावर मात करून आपल्या घरी परतले आहेत. यामुळे रूग्णांच्या आकडेवारीत वाढ असल्याने टेंशन वाढविणारा सप्टेंबर महिना तेवढ्यात प्रमाणात कोरोनावर मात करून घरी परतलेल्या कोरोना योद्धांमुळे दिलासादायक ही ठरला आहे.
मास्क करणार आपली सुरक्षा
कोरोनाच्या या लढाईत शारीरिक अंतर व मास्कचा नियमित वापर हे २ शस्त्र माणसाच्या हाती आहेत. त्यातही मास्कमुळे आजघडीला आपण सर्वाधिक सुरक्षित असल्याचे डॉक्टर्सही सांगत आहेत. त्यामुळे हा माझा मित्र, हा माझा सहकारी, हा माझा नातेवाईक या गोष्टी बाजूला सारून कुणाच्याही संपर्कात येण्यापूर्वी मास्क लावण्याची गरज आहे.
घरीच राहण्याची गरज
सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने होत असल्याने व्यापाऱ्यांनी जनता कर्फ्यू पुकारला आहे. या जनता कर्फ्यूला बाजारात चांगला प्रतिसाद असतानाच शहरातील अन्य भागांत मात्र प्रतिसाद दिसून येत नाही. मात्र नागरिकांनी घरीच राहून स्वत:ला व कुटुंबाला सुरक्षित ठेवणे गरजेचे झाले आहे. शहरातील प्रत्येकच भागात कोरोना रूग्ण निघून येत असल्याने अधिकच सावधान राहण्याची आता खरी गरज आहे.