दिलासादायक ! दोन नवीन कोरोना बाधितांची भर, तर आठ रुग्णांची सुटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2021 05:00 AM2021-02-19T05:00:00+5:302021-02-19T05:00:12+5:30

गुरुवारी जिल्ह्यात आढळून आलेले नवीन दोन रुग्ण गोंदिया तालुक्यातीलच आहेत, तर सुटी देण्यात आलेल्या आठ रुग्णांमध्ये गोंदिया तालुक्यातील ५ व तिरोडा तालुक्यातील तीन रुग्ण आहेत. यानंतर आता ५२ क्रियाशील रुग्ण उरले असून, यामध्ये गोंदिया तालुक्यातील ४४, गोरेगाव २, आमगाव १, सालेकसा २, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील १, तर इतर जिल्हा व राज्यातील २ रुग्ण आहेत.

Comfortable! Addition of two new corona sufferers, while eight patients leave | दिलासादायक ! दोन नवीन कोरोना बाधितांची भर, तर आठ रुग्णांची सुटी

दिलासादायक ! दोन नवीन कोरोना बाधितांची भर, तर आठ रुग्णांची सुटी

Next
ठळक मुद्देजिल्ह्यात आता ५२ क्रियाशील रुग्ण : मात्र सतर्कता बाळगण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया :  राज्यात पुन्हा एकदा कोरोना फोफावताना दिसत असतानाच जिल्ह्यात मात्र कोरोना नियंत्रणात आहे. यामुळेच गुरुवारी (दि.१८) जिल्ह्यात २ नवीन बाधितांची भर पडली असून आठ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. यानंतर आता जिल्ह्यातील बाधितांची संख्या १४,३०८ एवढी झाली असून, १४,०७२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, तर आता ५२ क्रियाशील रुग्ण जिल्ह्यात उरले आहेत. 
गुरुवारी जिल्ह्यात आढळून आलेले नवीन दोन रुग्ण गोंदिया तालुक्यातीलच आहेत, तर सुटी देण्यात आलेल्या आठ रुग्णांमध्ये गोंदिया तालुक्यातील ५ व तिरोडा तालुक्यातील तीन रुग्ण आहेत. यानंतर आता ५२ क्रियाशील रुग्ण उरले असून, यामध्ये गोंदिया तालुक्यातील ४४, गोरेगाव २, आमगाव १, सालेकसा २, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील १, तर इतर जिल्हा व राज्यातील २ रुग्ण आहेत. विशेष म्हणजे, राज्यात कोरोना पुन्हा फोफावत असून, याकडे लक्ष देत राज्य शासनाकडून पुन्हा काही निर्बंध लावण्यात येत आहेत. त्यानुसार, जिल्ह्यातही त्यांची अंमलबजावणी केली जाणार आहे. राज्यात फोफावत असतानाच विदर्भाला केंद्रीय समितीने सतर्कतेचा इशारा दिला आहे. अशात जिल्ह्यात जरी कोरोना नियंत्रणात असला तरीही जिल्हावासीयांनी आता आणखी सतर्कतेने वागण्याची गरज आहे. यासाठी मास्कचा नियमित वापर, शारीरिक अंतराचे पालन व वारंवार हातांची स्वच्छता या त्रिसूत्रीचा काटेकोरपणे अंमल करावाच लागणार आहे. 
चाचण्या वाढविण्यावर भर 
कोरोनाचा उद्रेक बघता आता जिल्ह्यात चाचण्या वाढविण्यावर भर देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार, चाचण्या वाढविल्या जाणार आहेत. तर आतापर्यंत १,३५,९९९ चाचण्या जिल्ह्यात झाल्या आहेत. यामध्ये ६८,५४२ आरटी-पीसीआर चाचण्या असून त्यात ८,४४६ पॉझिटिव्ह, तर ५६,८४६ चाचण्या निगेटिव्ह आहेत. तसेच ६७,४५७ रॅपीड ॲंटिजेन चाचण्या असून, यातील ६,१५७ पॉझिटिव्ह, तर ६,१३०० चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत. 
मास्क लावा अन्यथा दंड 
राज्यात कोरोनाचा वाढता उद्रेक बघता मास्क व लावणाऱ्यांना थेट दंड ठोठावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार, जिल्हाधिकाऱ्यांनीही आदेश काढले असून, मास्क व लावता फिरणाऱ्यांना १०० रुपये दंड ठोठावला जाणार आहे. विशेष म्हणजे, कोरोनाचा उद्रेक आता अत्यंत धोकादायक ठरणार आहे. अशात नागरिकांनी पैसे वाचविण्यासाठी नव्हे तर आपला जीव वाचविण्यासाठी मास्क लावणे गरजेचे झाले आहे.

 

Web Title: Comfortable! Addition of two new corona sufferers, while eight patients leave

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.