हिरडामाली येथे धान खरेदी केंद्र सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:28 AM2021-05-24T04:28:11+5:302021-05-24T04:28:11+5:30
गोरेगाव : तालुक्यातील ग्राम हिरडामाली येथील शेतकरी अभिनव सहकारी संस्थेत शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. ...
गोरेगाव : तालुक्यातील ग्राम हिरडामाली येथील शेतकरी अभिनव सहकारी संस्थेत शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांची रब्बी हंगामातील धानविक्रीची समस्या मार्गी लागणार आहे. या धान खरेदी केंद्र उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार डॉ. खुशाल बोपचे होते तर पूजन तालुका खरेदी-विक्री समितीचे माजी अध्यक्ष सी. टी. चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी सभापती पी. जी. कटरे, माजी उपसरपंच राजकुमार भेलावे, महेश अग्रवाल, नरेश लोनारकर, अतुल कटरे, लोकेश कटरे, बंडू रहांगडाले, गिरधारी बोपचे, रवी पटले, नितीन बिसेन, आदी उपस्थित होते. रब्बी हंगामाचे धान विक्रीसाठी शेतकऱ्यांना आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू होण्याची प्रतीक्षा होती. यासाठी शेतकरीही पाठपुरावा करत होते. आता शेतकरी अभिनव सहकारी संस्थेत धान खरेदी केंद्र सुरू झाल्याने शेतकऱ्यांना हमीभावात धान विक्री करता येणार आहे.