मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत रस्ता बांधकामाला सुरुवात ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:22 AM2021-06-04T04:22:47+5:302021-06-04T04:22:47+5:30
गोरेगाव : ग्रामीण भागाचा विकास व्हावा यासाठी आ. विजय रहांगडाले यांनी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत दत्त मंदिर डोंगरुटोला ते ...
गोरेगाव : ग्रामीण भागाचा विकास व्हावा यासाठी आ. विजय रहांगडाले यांनी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत दत्त मंदिर डोंगरुटोला ते सटवा या २.७२ किमी रस्त्याकरिता १ कोटी ७१ लक्ष रुपयांचा निधी मंजूर करुन घेतला. या रस्ता बांधकामाचे भूमिपूजन बुधवारी आ. विजय रहांगडाले यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष हेमंत पटले, माजी आमदार खोमेश्वर रहांगडाले, जीडीसीसी बँकेचे संचालक रेखलाल टेंभरे, भाजप तालुकाध्यक्ष साहेबराव कटरे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष दुर्गा ठाकरे, भाजप जिल्हा किसान आघाडी उपाध्यक्ष सुरेंद्र बिसेन, जिल्हा सचिव गुड्डू ठाकरे, माजी जि.प. सदस्य विश्वजित डोंगरे, रोहिणी वरखडे, माजी पं.स.सदस्य पुष्पराज जनबंधू, सरपंच विनोद पारधी, शकुंतला कटरे, अनंता ठाकरे, उपसरपंच होमेंद्र तांडेकर, ओमप्रकाश चौधरी, माजी तालुकाध्यक्ष डॉ. लक्ष्मण भगत, योगेश चौधरी, संतोष रहांगडाले उपस्थित होते.