९ कोटी ८७ लाख रुपयांच्या विविध विकासकामांना सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:28 AM2021-03-05T04:28:54+5:302021-03-05T04:28:54+5:30
गोंदिया : गोंदिया विधानसभा क्षेत्रातील ९ कोटी ८७ लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन आमदार विनोद अग्रवाल यांच्या हस्ते बुधवारी ...
गोंदिया : गोंदिया विधानसभा क्षेत्रातील ९ कोटी ८७ लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन आमदार विनोद अग्रवाल यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले.
यावेळी प्रामुख्याने ढाकणीच्या सरपंच नामदेव शहारे, फत्तेपूरचे सरपंच वनिता बघेले, नंगपुराचे सरपंच ओमप्रकाश रहांगडाले, पिंडकेपार सरपंच सुधीर चन्द्रिकापुरे, हिवराचे सरपंच ब्रिजलाल मारगाये, चुटियाचे सरपंच कैलाश गजभिये, उपसरपंच अजित टेंभरे, लोधीटोलाचे सरपंच संजय ठाकरे, रापेवाडाचे सरपंच जीवन चव्हाण, तेढवाचे सरपंच गोविंद तुरकर, माजी जि. प. सभापती शैलजा सोनवाने, दीपा चन्द्रिकापुरे, रामराज खरे, छत्रपाल तुरकर, सुभान रहांगडाले, रमेश गौतम, अंकेश येडे, बलिराम शरणागत, तीर्थराज रहांगडाले, शालिक रसके, देवलाल मात्रे, मोहन गौतम, मोहन राणे, धनंजय रिनायत, गंगाराम पटले, शंकर अत्रे, भूपेंद्र टेंभरे, फुलचंद बनोटे, दशरथ बिसेन, प्रितम मेश्राम, ज्ञानेश्वर राऊत, उत्तम मंडिया, सचिन पालांदूरकर, कपिल राणे, रवि राणे, भावलाल रहांगडाले, दशरथ मात्रे, दिनेश मेश्राम उपस्थित होते. गोंदिया विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक गावात पायाभूत आणि इतर विकासकामे करून गावाचा कायापालट करण्याचा संकल्प यावेळी आमदार अग्रवाल यांनी व्यक्त केला. गावांचा विकास झाल्यास निश्चितच जिल्ह्याचा सुद्धा सर्वांगीण विकास होईल त्यामुळे हेच ध्येय समोर ठेवून गाव आणि प्रत्येक व्यक्तीचा विकास करणाऱ्यावर भर देण्याचा आपला प्रयत्न राहील, असे आमदार अग्रवाल यांनी सांगितले. यावेळी भूमिपूजन करण्यात आलेल्या कामांमध्ये १ कोटी ५५ लाख रुपये नंगपुरा-मुर्री-शेंद्रीटोला रस्ता बांधकाम, भागवतटोला-हिवराटोला रस्ता बांधकाम १ कोटी ६४ लाख रुपये, चुटिया-लोधीटोला रस्ता सीसीरोड व नालीबांधकाम १ कोटी ३० लाख रुपये, चुटीया ते रापेवाडा रस्ता बांधकामासाठी ३ कोटी ४९ लाख रुपये, तेढवा-मरारटोला सीसी रोड व नालीबांधकामासाठी ९९ लाख ७७ हजार रुपये, ढाकणी ते फत्तेपूर रस्ता व नाली बांधकाम ८८ लाख ६४ हजार रुपये अशा एकूण ९ कोटी ८७ लाख रुपयांच्या कामांचा समावेश आहे.