समाज कल्याण सभापतीवर आयुक्त मेहरबान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2019 09:36 PM2019-06-07T21:36:18+5:302019-06-07T21:36:51+5:30

जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती विश्वजीत डोंगरे यांना १५ मार्च रोजी गिधाडी येथील कंत्राटदार प्रेमलाल मन्साराम शेंडे (५२) यांच्याकडून १ लाख २५ हजार रुपयांची लाच खासगी इसम फनिंद्र मुलचंद पटले (३०) रा. आंबेतलाव याच्या माध्यमातून घेतांना अटक करण्यात आली.

Commissioner of Social Welfare | समाज कल्याण सभापतीवर आयुक्त मेहरबान

समाज कल्याण सभापतीवर आयुक्त मेहरबान

Next
ठळक मुद्देसीईओंच्या पत्राकडे दुर्लक्ष : जिल्हा परिषद अधिनियमांची आयुक्तांकडून पायमल्ली

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती विश्वजीत डोंगरे यांना १५ मार्च रोजी गिधाडी येथील कंत्राटदार प्रेमलाल मन्साराम शेंडे (५२) यांच्याकडून १ लाख २५ हजार रुपयांची लाच खासगी इसम फनिंद्र मुलचंद पटले (३०) रा. आंबेतलाव याच्या माध्यमातून घेतांना अटक करण्यात आली. ते लोकसेवक म्हणून सभापतीपदाचे काम सांभाळत असतांना त्यांनी केलेल्या गैरप्रकारावर त्यांना पदावरून हटविणे आवश्यक होते. त्यांच्यावर कायदेशिर कारवाई करण्यात यावी.
या आशयाचे पत्र जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजा दयानिधी यांनी ७ एप्रिल २०१८ ला विभागीय आयुक्त नागपूर यांना पाठविले. परंतु वर्षभरापासून आयुक्तांनी त्या पत्रावर कुठलीच कारवाई केली नाही.
गोंदिया जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती विश्वजीत डोंगरे यांना १५ मार्च २०१८ ला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे दिलीप वाढणकर यांनी लाच घेतांना रंगेहात पकडले. लोकसेवक किंवा लोकप्रतिनिधी आपल्या पदाचा गैरवापर करीत असेल तर महाराष्टÑ जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ चे कलम ८८ (विषय समितीच्या सभापतीस अधिकार पदावरून दूर करणे) अन्वये विषय समितीच्या सभापतीने आपली कर्तव्य पार पाडीत असताना केलेल्या गैरवर्तवणुकीबद्दल किंवा कोणत्याही लज्जास्पद वर्तनामुळे दोषी ठरल्याबद्दल राज्य शासनास कलम ८७ च्या तरतूदीस बाधा न देता त्यास अधिकारपदावरून दूर करता येईल अशी तरतूद आहे. महाराष्टÑ जिल्हा परिषदा व पंचायत समिती अधिनीयम १९६१ चे कलम २७८ जिल्हा परिषद सदस्य इत्यादी व्यक्ती लोकसेवक हा अधिकारपद धारण करणारा हा भारतीय दंड संहीता कलम २१ (१८३० चा ४५) याच्या अर्थानुसार लोकसेवक आहे, असे माणण्यात येण्याची तरतूद आहे.
समाज कल्याण सभापती विश्वजीत डोंगरे रा.घोटी ता. गोरेगाव यांच्याविरूध्द १५ मार्च २०१८ रोजी गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधात्मक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
यासंदर्भात जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी ७ एप्रिल २०१८ ला विभागीय आयुक्त नागपूर यांना पत्र पाठविले. परंतु वर्षभरापासून आयुक्तांनी त्या पत्रावर काहीच कारवाई केली नाही.
कारवाई न करण्यासाठी राजकीय दबाव?
समाज कल्याण सभापती विश्वजीत डोंगरे यांना लाच घेतांना अटक झाल्यानंतर त्यांना पदावरून कायद्याने दूर करणे अपेक्षीत असताना त्यांना हटविण्यात आले नाही.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी आपले काम चोखपणे बजावले. त्यांनी या संदर्भात पत्र आयुक्तांना पाठवून जिल्हा परिषद अधिनियमात काय तरतूद आहे. याची माहिती देखील दिली. परंतु ७ एप्रिल २०१८ ला दिलेल्या पत्रावर वर्षभराचा कालावधी लोटूनही कारवाई न झाल्यामुळे राजकारणाच्या दबावापोटी आयुक्त कारवाई करीत नसल्याची चर्चा आहे. आपल्या पक्षातील सभापतीचे पद जाऊ नये यासाठी कोणते नेते पुढाकार घेऊन पद वाचवित आहेत याची जोरदार चर्चा जिल्हा परिषदेत आहे.

Web Title: Commissioner of Social Welfare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.