शेतकरी, मजूर आणि कामगारांसाठी वचनबद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2018 10:31 PM2018-07-09T22:31:48+5:302018-07-09T22:32:12+5:30
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी अटल विश्वकर्मा सन्मान योजना राज्यात मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रथमच सुरू केली. माझ्यावर लोकांनी विश्वास केला, त्याला तडा जाऊ देणार नाही. शेतकरी, शेतमजूर व गवंडी कामगार यांच्यासाठी शासनाच्या विविध योजना आहेत. त्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवून त्यांचा लाभ मिळवून देणार. त्यासाठी मी वचनबध्द आहे, असा विश्वास आ. विजय रहांगडाले यांनी व्यक्त केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
परसवाडा : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी अटल विश्वकर्मा सन्मान योजना राज्यात मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रथमच सुरू केली. माझ्यावर लोकांनी विश्वास केला, त्याला तडा जाऊ देणार नाही. शेतकरी, शेतमजूर व गवंडी कामगार यांच्यासाठी शासनाच्या विविध योजना आहेत. त्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवून त्यांचा लाभ मिळवून देणार. त्यासाठी मी वचनबध्द आहे, असा विश्वास आ. विजय रहांगडाले यांनी व्यक्त केला.
दवनीवाडा येथे शेतकरी, शेतमजूर व कामगारांचा मेळावा घेण्यात आला. यात अध्यक्षीय भाषणातून मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
याप्रसंगी प्रामुख्याने कृषी व पशुसंवर्धन सभापती शैलजा सोनेवाने, जि.प. सदस्य छाया दसरे, पं.स. सदस्य गुड्डू लिल्हारे, सरपंच बेबीनंदा चौरे, रमेश चिल्हारे, कमलेश दमाहे, नेहरु उपवंशी, उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर, कामगार सहआयुक्त मसराम, सहायक खंडविकास अधिकारी झामसिंग टेंभरे, डॉ. बसंत भगत, काशीराम लांजेवार, सुरेश पटले, भूमेश्वर पिपरेवार, तहसीलदार भलावी, विस्तार अधिकारी खोटेले, मंडळ अधिकारी पोरशेट्टीवार, तलाठी कापगते तसेच परिसरातील सर्व सरपंच, सदस्य, पंचायत समिती सदस्य व कामगार उपस्थित होते.
आमदार रहांगडाले म्हणाले, मंडळातर्फे बांधकाम कामगारांसाठी २८ विविध कल्याणकारी योजना आहेत. त्यांचा लाभ १८ ते ६० वयोगटातील कामगारांनी घेण्यासाठी नोंदणी शुल्क भरुन नोंदणी करावे. गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कामगार आहेत. त्यासाठी विशेष बाब म्हणून ४ जुलै ते ४ आॅगस्ट २०१८ या कालावधीत नोंदणी करावी. यात मनरेगा मजूर, गवंडी काम, सुतार, इमारत, रस्ते, रेल्वे, ट्रामवेज, एअर फिल्ड, पाटबंधारे, पूर, टॉवर, कालवे, जलाशय, तेलवायु, विद्युत, पूल, सेतू, पाईपलाईन, दगडकाम या २१ कामांचा समावेश आहे, असे सांगितले.
उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर यांनीही मार्गदर्शन केले व सर्व संबंधित कर्मचाऱ्यांना नोंदणीबद्दल निर्देश दिले. तसेच कोणत्याही कामगाराची फसवणूक करू नये, असे सांगितले. सभापती सोनवाने व कामगार आयुक्त मसराम यांनीसुद्धा कामगारांना मार्गदर्शन केले.
या ठिकाणी नोंदणी झालेल्या पाच कामगारांना नोंदणी प्रमाणपत्र आ. रहांगडाले यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. या वेळी छाया जगणित, इंद्रा बिंझाडे, गणेश लिल्हारे, कमला कोहरे यांचा नोंदणी प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविक खंडविकास अधिकारी टेंभरे यांनी मांडले. संचालन महेंद्र बघेले यांनी केले. आभार गुड्डू लिल्हारे यांनी मानले. कार्यक्रमासाठी राजेश उरकुडे, बंटी श्रीबांसरी, सुरेश पटले, कैलाश गौतम, पप्पाजी अटरे, कन्हैया नागपुरे, संतोष सूर्यवंशी, बनेश लिल्हारे, रमेश उजगावकर, सुनिता लिल्हारे, मनोरमा चवरे, सुनिता पन्डेले, सरस्वती सूर्यवंशी, गिरजा मानकर, निरज सोनवाने, सविता पटले, कांता सूर्यवंशी, ग्रामसेवक, रोजगार सेवक व कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.