जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2018 09:43 PM2018-08-16T21:43:05+5:302018-08-16T21:44:04+5:30

जिल्ह्यातील विविध घटकातील गरजू लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. शासनाच्या योजनांची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध आहोत.

Committed to the overall development of the district | जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध

जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध

Next
ठळक मुद्देराजकुमार बडोले : विविध क्षेत्रातील मान्यवरांच सत्कार, विकास कामांना देणार गती

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यातील विविध घटकातील गरजू लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. शासनाच्या योजनांची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध आहोत. असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
भारतीय स्वातंत्र्याच्या ७२ व्या वर्धापन दिनाचे मुख्य शासकीय ध्वजारोहण बुधवारी (दि.१५) कारंजा येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर करण्यात आले होते. या वेळी ते बोलत होते. जि.प.अध्यक्ष सीमा मडावी, आ.गोपालदास अग्रवाल, माजी आमदार डॉ. खुशाल बोपचे, जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. एम. राजा दयानिधी, पोलीस अधीक्षक हरिष बैजल उपस्थित होते.
बडोले म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी ऐतिहासिक कर्जमाफी करून राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफीचा लाभ जिल्ह्यातील ६६ हजार ३३१ शेतकरी सभासदांना मिळाला असून त्यांचे कर्जखाते शून्य झाले आहे.शेवटच्या पात्र शेतकºयाला जोपर्यंत कर्जमाफी मिळत नाही तोपर्यंत कर्ज माफीची योजना सुरु राहील असे शासनाचे धोरण आहे. जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, राष्ट्रीयकृत बँक व ग्रामीण बँकांकडून २७ हजार १९४ शेतकºयांना १३० कोटी रुपये खरीप पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. जिल्ह्यातील मजुरांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना जिल्ह्यात यशस्वी ठरली आहे. चालू वर्षात १ लाख ४४ हजार २११ कुटूंबांना रोजगार पुरविण्यात आला आहे. त्यापैकी ८ हजार ९१२ कुटूंबांना १०० दिवस रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. जिल्हाधिकाºयांच्या प्रोत्साहनामुळे जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी मोठ्या प्रमाणात प्रधानमंत्री पीक विमा योजनेला सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे ३३ हजार ८९२ शेतकºयांनी पीक विमा योजनेचा हप्ता भरला आहे.नैसर्गीक संकटामुळे शेतीचे नुकसान झाल्यास या योजनेतून शेतकºयांना मदत करण्यात येईल. जिल्ह्यात गोंदिया, गोरेगाव व तिरोडा या तीन तालुक्यात खरीप हंगाम २०१७ करीता दुष्काळ जाहीर करण्यात आला होता. या तालुक्यात संयुक्त पंचनामे करून २७ कोटी २० लाख रुपये इतक्या नुकसान भरपाईची मागणी शासनाकडे नोंदविली होती. सदर रक्कम महसूल विभागास प्राप्त झाली असून ती १ लाख ८४ हजार ५२७ शेतकºयांना वाटप करण्यासाठी बँकेकडे वर्ग करण्यात आली आहे. खरीप हंगाम सन २०१७-१८ मध्ये तुडतुडा किडीमुळे शेतकºयांच्या भात पिकांचे नुकसान झाले. शासनाने नुकसान भरपाई पोटी ४१ कोटी ५० लाख रु पयांचा निधी मंजूर केला आहे. सदर निधी १ लाख ५ हजार ६८८ शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला आहे.
जलयुक्त शिवार अभियान हा महाराष्ट्र शासनाचा अत्यंत महत्वाकांक्षी कार्यक्रम जिल्ह्यात सन २०१५-१६ पासून राबविण्यात येत असून या वर्षात ९४ गावाची निवड करण्यात आली होती. यापैकी ९४ गावे जलपरिपूर्ण झाली आहेत. सन २०१६-१७ मध्ये ७७ गावामधील २ हजार ६२१ कामे पूर्ण झाली असून २० हजार ६९७ टिसीएम पाणी साठा निर्माण झाला आहे. यामुळे ४१ हजार ३९३ हेक्टर संरिक्षत सिंचन निर्माण झाले आहे. सन २०१७-१८ वर्षात ६३ गावांपैकी ५५ गावे जलपरिपूर्ण झाली आहेत. याचा लाभ सिंचनासाठी निश्चितच होईल असे सांगितले. या वेळी पालकमंत्र्यांनी ध्वजारोहणानंतर राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. त्यानंतर त्यांनी परेडचे निरीक्षण केले. पोलीस पथक, जलद प्रतिसाद पथक, दंगा नियंत्रण पथक, जिल्हा वाहतूक शाखा, होमगार्ड पथक, आर.एस.पी.पथक, स्काऊट-गाईड पथक, बँड पथक व श्वान पथक यांनी संचलन केले. ध्वजारोहणानंतर पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील उत्कृष्ट कामिगरी करणाºया व्यक्तींचा सत्कार केला.
या वेळी जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे, अपर जिल्हाधिकारी अशोक लटारे, निवासी उपजिल्हाधिकारी हरिष धार्मिक उपस्थित होते. संचालन व उपस्थितांचे आभार गुरुनानक शाळेच्या शिक्षिका मंजुश्री देशपांडे यांनी मानले.

Web Title: Committed to the overall development of the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.