विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यास कटिबद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2018 12:13 AM2018-09-02T00:13:08+5:302018-09-02T00:13:47+5:30
जिल्ह्यातील शिक्षणाचा स्तर सुधारण्यासाठी तसेच शाळांचे व्यवस्थापन व शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यातूनच विधानसभा क्षेत्राच्या टोकावर वसलेल्या शिवाटोला येथील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण जिल्हा परिषद शाळेतून मिळावे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यातील शिक्षणाचा स्तर सुधारण्यासाठी तसेच शाळांचे व्यवस्थापन व शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यातूनच विधानसभा क्षेत्राच्या टोकावर वसलेल्या शिवाटोला येथील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण जिल्हा परिषद शाळेतून मिळावे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. प्रत्येक विद्यार्थी शिकावा व पुढे जावा, याच उद्देशातून जिल्हा परिषद शिक्षण विभाग कार्य करीत असल्याचे प्रतिपादन आमदार गोपलदास अग्रवाल यांनी केले.
ग्राम शिवाटोला (तांडा) येथे तीन लाख रूपयांच्या निधीतून मंजूर जिल्हा परिषद शाळेच्या सुरक्षा भिंतीच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी माजी पंचायत समिती सदस्य भास्कर रहांगडाले यांनी, क्षेत्रात होत असलेली विकासकामे आमदार अग्रवाल यांचे कार्य असल्याचे मत व्यक्त केले. याप्रसंगी कॉँग्रेस ग्राम अध्यक्ष रामसिंग परिहार, मुनेश रहांगडाले, केवल उके, गणराज खांडेकर, उत्तमचंद खांडेकर, कुमेश्वर बिसेन, नटराज बिसेन, ओमचंद्र बिसेन, मुलचंद बिसेन, सुरेखा खांडेकर, शिला खांडेकर, रोहिणी गौतम, बंटी बहेकार, सरपंच रविंद्र पंधरे व गावकरी उपस्थित होते.