हौशी कलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी गोंदियामध्ये नाट्यगृह!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2022 08:57 PM2022-12-12T20:57:51+5:302022-12-12T20:58:32+5:30

गोंदिया येथील नाट्यगृहाला पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे नाव देणार

Committed to promoting amateur artists says Maharashtra Minister Sudhir Mungantiwar | हौशी कलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी गोंदियामध्ये नाट्यगृह!

हौशी कलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी गोंदियामध्ये नाट्यगृह!

googlenewsNext

Sudhir Mungantiwar: गोंदिया येथे सांस्कृतिक विभागाकडून प्रस्तावित व नगर परिषदेकडून  बांधण्यात येणाऱ्या अद्ययावत नाट्यगृहाला पं. दीनदयाळ उपाध्याय यांचे नाव देण्यात यावे आणि त्याचे लोकार्पण व्हावे यासाठी युद्ध स्तरावर काम करा, असे निर्देश राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज दिले. झाडीपट्टी आणि हौशी कलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून गोंदिया येथे अद्ययावत आणि सुसज्ज नाट्यगृह व्हावे आणि ते कलावंतांना परवडेल अशा दरात उपलब्ध करुन द्यावे असेही निर्देश मुनगंटीवार यांनी यावेळी दिले. या सभागृहासाठी सौरऊर्जेचा अधिक वापर व्हावा अशा सूचना त्यांनी दिल्या.

नाट्यगृह बांधण्यासाठी वाढीव अंदाजित खर्च याबाबत बैठकीत चर्चा झाली आणि २३.५३ कोटी रुपयांचा नवीन प्रस्ताव नव्याने सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावाला सुधीर मुनगंटीवार यांनी तात्काळ मान्यता देऊन ३१ डिसेंबर पर्यंत सुधारित मान्यता प्रदान करण्याच्या सूचना उपसचिव यांना दिल्या. निधी शक्य तितक्या लवकर उपलब्ध करुन दिला जाईल असे सांगून नगर परिषदेने हे काम तातडीने करुन घ्यावे असे निर्देश दिले. यासोबतच या सभागृहाच्या इमारतीत असलेल्या ३४ गळ्यांसाठी नगरोत्थान योजनेतून निधी उपलब्ध करुन दिला जाईल असेही सांगितले.

Web Title: Committed to promoting amateur artists says Maharashtra Minister Sudhir Mungantiwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.