राष्ट्रीयकृत बँकेत सामान्य जनतेची गळचेपी

By Admin | Published: June 25, 2017 12:51 AM2017-06-25T00:51:18+5:302017-06-25T00:51:18+5:30

तालुक्याच्या व इतर ठिकाणी कार्यरत असलेल्या राष्ट्रीयकृत बँकेच्या नवनवीन अलिखित नियमांमुळे

The common man's throats at Nationalized Bank | राष्ट्रीयकृत बँकेत सामान्य जनतेची गळचेपी

राष्ट्रीयकृत बँकेत सामान्य जनतेची गळचेपी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
बोंडगावदेवी : तालुक्याच्या व इतर ठिकाणी कार्यरत असलेल्या राष्ट्रीयकृत बँकेच्या नवनवीन अलिखित नियमांमुळे परिसरातील सामान्य जनता मात्र दिवसेंदिवस कमालीची त्रस्त होत आहे. सदर बँकेच्या कर्मचाऱ्यांवर कोणत्याही लोकप्रतिनिधीचा जरब नसल्याने बँकेचे संबंधित कर्मचारी स्वत:ची तानाशाही अंगिकारुन सामान्य जनतेला वेठीस धरण्याचा प्रयत्न करीत असल्याचे चित्र तालुकास्तरावर दिसून येत आहे. स्वत:चेच पैसे काढण्यासाठी बँकेच्या आवारात चकरा माराव्या लागत असल्याचे चित्र अनेकदा दिसून येत आहे. सामान्य ग्राहकांची अडचण दूर सारण्यास स्वारस्व न दाखविता स्वत:च आडमुठी धोरणाचा अंगिकार करण्यास कोणतीच कसर सोडत नसल्याचे दिसून येते.
केंद्र सरकारच्या ध्येय धोरणानुसार देशातील जनतेने बँकाशी आर्थिक व्यवहार करावा असा फर्मानच सोडला आहे. मोठ्या प्रमाणात सामान्य जनता ग्रामीण भागात विखुरली आहे. गावागावात बँकेचे जाळे पसरले नाही. तालुक्याच्या व मोठ्या गावात राष्ट्रीयकृत बँकेच्या शाखा कार्यरत आहेत. त्यामुळे तालुक्यातील कोसो दूर अंतर कापून बँकेत यावे लागते. बँकेचे अधिकारी मात्र ग्रामीण भागातून येणाऱ्या ग्राहकांना सौजन्याची वागणूक देताना दिसून येत नाही. तासनतास सामान्य जनतेला सावधानतेच्या इबाबत ताटकळत उभे राहावे लागते.
आजही बँक शाखांमध्ये बऱ्याच गैरसोयींचा महापूर दिसून येतो. देवाण-घेवाण करण्यासाठी खिडक्यांची कमतरता असताना शाखा व्यवस्थापक पर्यायी व्यवस्था न करता वातानुकुलित पिंजऱ्यात बसून ग्राहकांना मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न करतात.
आर्थिक देवाण-घेवाण करताना पूर्वी जी टोकण पद्धती अवलंबीण्यात येत होती, ती पद्धत आजघडीला दिसेनासी झाल्याने सामान्य जनतेच्या त्रासाने परिसिमेचे कळस गाठल्याचे दिसते.

स्टेट बँकेत कमालीचा त्रास
तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या भारतीय स्टेट बँकेत ग्राहकांना कमालीचा मन:स्ताप सहन करावा लागत असल्याचे शाखेत फेरफटका मारल्याने प्रत्यक्षात दिसून येत आहे. सदर शाखेत ६ कर्मचारी असल्याचे सांगितले जाते. संबंधितांकडून कामाच्या गतीमानतेत वाढ न दिसता ‘ टाईमपास’ प्रवृत्ती अनेकदा त्यांच्या प्रणालीवरुन दिसून येत आहे. शाखेच्या धनादेश प्राप्त एका ग्राहकाने एक ‘बेअरर’ धनादेश त्याची सही प्रमाणित करुन दिला. तो धनादेश घेऊन ती व्यक्ती शाखेत गेली. ओळख प्रमाण द्या, अशी आग्रही भूमिका अंगिकारली. ज्याच्या नावाने धनादेश होता त्यांनी सदर कर्मचाऱ्यांना प्रमाणित केलेली स्वाक्षरी व तुमच्या समोर करण्यात येत असलेली स्वाक्षरी समान नसेल तर ती व्यक्ती नाही असे समजावले. परंतु त्या कर्मचाऱ्यांनी आपला हेका कायमस्वरुपी ठेवून ३ तास रांगेत उभ्या राहिलेल्या त्या धनादेश धारकास मन:स्ताप सहन करुन माघारी फिरावे लागले. नियमांची बतावणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आवश्यक सुचना दर्शनी भागात लावलेले दिसले नाही. क्षुल्लक कारणावरुन ग्राहकांना नामोहरम करण्याचा प्रकार नेहमी शाखेत होत असल्याची ओरड आहे. काहीही म्हणा ग्रामीण जनता मात्र बँकेच्या व्यवहाराने कमालीची त्रस्त झालेली दिसत आहे.

 

Web Title: The common man's throats at Nationalized Bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.