विम्यास नकार देणाऱ्या कंपनीला हिसका
By admin | Published: January 14, 2016 02:20 AM2016-01-14T02:20:28+5:302016-01-14T02:20:28+5:30
शेतकऱ्यांचा अपघात विमा नाकारणाऱ्या दि न्यू इंडिया इंन्शुरन्स कंपनीला जबर धक्का देत जिल्हा तक्रार तक्रार ...
ग्राहक मंच : व्याजासह रक्कम द्या
गोंदिया : शेतकऱ्यांचा अपघात विमा नाकारणाऱ्या दि न्यू इंडिया इंन्शुरन्स कंपनीला जबर धक्का देत जिल्हा तक्रार तक्रार निवारण न्यायमंचाने अर्जदारांना नुकसान भरपाईसह अपघाती विम्याची रक्कम देण्याचे आदेश दिले आहे.
आमगाव तालुक्याच्या तिगाव येथील शेतकरी चैतराम सोमा बिसेन यांची शेत जमीन आहे. ६ जून २०१३ रोजी चैतराम बिसेन घराच्या कवेलूंची छावणी करताना शिडीवरुन पडल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या संदर्भात त्यांची पत्नी अनुसया बिसेन यांनी ग्राहक न्यायालयात ७ आॅक्टोबर २०१३ रोजी अर्ज केला. परंतु दि न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीने दावा ६-क खोडून ६-ड लिहिलेला दस्तावेज असल्याचे सांगून भूमापन क्रमांक व सर्वे नंबर जळत नाही, असे कारण दाखवून त्यांचे प्रकरण फेटाळले होते.
ग्राहक न्यायालयाने या शेतकरी महिलेला न्याय देत १ लाख रुपये विमा दाव्याची रक्कम व त्रासापोटी ३० हजार रुपये तक्रारीचा खर्च १० हजार रुपये ४ एप्रिल २०१५ पासून आजपर्यंत ९ टक्के दराने देण्याचे आदेश दिले.
दुसरे प्रकरण देवरी तालुक्याच्या मुरमाडी येथील आहे. नवल उदरास सोनकुकरा हे १६ जुलै २०१३ रोजी नाला पार करुन शेतात जात असताना पाय घसरल्याने पुरात वाहून त्यांचा मृत्यू झाला. त्यांची मुरमाडी येथे शेत जमीन असल्याने या संदर्भात त्यांची पत्नी सुकारोबाई व मुलगा धनशू यांनी विम्यासाठी प्रकरण टाकले. त्यांनाही इंन्शुरन्स कंपनीने ६-ड हे दस्तावेज प्रस्तावासोबत जोडले नाही असे म्हणून दावा फेटाळला. यावर जिल्हा ग्राहक न्यायालयाने १ लाख रुपये विम्याची रक्कम १७ एप्रिल २०१५ पासून निकाल लागेपर्यंत दर साल दर सेकडा ९ टक्के दराने देण्याचे आदेश दिले. तसेच शारीरिक व मानसिक त्रासपोटी ५ हजार रुपये तक्रारीचा खर्च ५ हजार रुपये महिन्या भराच्या आत देण्याचे आदेश दिले. (तालुका प्रतिनिधी)