नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करून नुकसानभरपाई द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:28 AM2021-05-16T04:28:08+5:302021-05-16T04:28:08+5:30

गोंदिया : मागील आठवड्यापासून जिल्ह्यात ढगाळ वातावरणासह अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. शहरासह जिल्ह्यातील अनेक भागांत वादळी वाऱ्यासह पावसाने ...

Compensate the damaged area through Punchnama | नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करून नुकसानभरपाई द्या

नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करून नुकसानभरपाई द्या

Next

गोंदिया : मागील आठवड्यापासून जिल्ह्यात ढगाळ वातावरणासह अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. शहरासह जिल्ह्यातील अनेक भागांत वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसाने रब्बी हंगामातील धान पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तर दुसरीकडे ग्रामीण भागातील अनेक घरांना व तसेच शेतातील झाडे ही कोसळल्याची माहिती आहे. नुकसानग्रस्त भागाची चौकशी करून व त्यांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी आमदार डॉ. परिणय फुके यांनी केली आहे. याबाबतचे पत्र आ. फुके यांनी मुख्यमंत्री तसेच पुनर्वसन मंत्री यांना पाठविले.

भारतीय हवामान विभागाच्यावतीने निर्देशित अंदाजानुसार आज जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्यावतीने वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तविली होती. विशेष म्हणजे जिल्ह्यात मागील तीन चार दिवसांपासून सायंकाळच्यासुमारास वादळी वाऱ्यासह पावसाच्या हलक्या सरी जिल्ह्यातील अनेक भागात येत होत्या. यामुळे ही शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. नुकसान झाल्याने नुकसानग्रस्त भागाची चौकशी करून व त्यांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी आमदार डॉ. परिणय फुके यांनी केली आहे.

Web Title: Compensate the damaged area through Punchnama

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.