शेतकऱ्यांना रबी पिकांची नुकसान भरपाई द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2020 06:00 AM2020-01-06T06:00:00+5:302020-01-06T06:00:20+5:30
नुकसानीचे महसूल विभागातंर्गत पंचनामे करुन त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी. शेतातील धानाचे पुंजण्याचे नुकसान झाले. त्याचे सुध्दा पंचनामे करुन नुकसान भरपाई द्यावी, धान खरेदी केंद्रावरील धानाची त्वरीत उचल करण्यात यावी. बागायती पिके व भाजीपाला उत्पादकांना सुध्दा अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात ३१ डिसेंबर ते २ जानेवारी दरम्यान अवकाळी पाऊस झाला. परिणामी रब्बी हंगामातील गहू, हरभरा, तूर, लाखोळी, जवस या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.परतीच्या पावसाने खरीपातील पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यातच अवकाळी पावसाने रब्बी पीक सुध्दा शेतकºयांच्या हातून गेल्याने आर्थिक संकट ओढावले आहे. त्यामुळे अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन शेतकºयांना नुकसान भरपाई देण्यात यावी. अशी मागणी जिल्हा जनक्रांती विकास आघाडीने माजी आ.दिलीप बन्सोड यांच्या नेतृत्त्वात मुख्यमंत्र्यांच्या नावे तहसीदारांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
या वेळी दिलेल्या निवेदनातून जिल्ह्यातील शेतकरी खरीप हंगामानंतर रब्बी पिकांची सुध्दा लागवड करतात. यंदा जिल्ह्यात ३६ हजार हेक्टरवर रब्बी पिकांची लागवड करण्यात आली आहे. मात्र जिल्ह्यात आठ दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
त्यामुळे या नुकसानीचे महसूल विभागातंर्गत पंचनामे करुन त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी. शेतातील धानाचे पुंजण्याचे नुकसान झाले. त्याचे सुध्दा पंचनामे करुन नुकसान भरपाई द्यावी, धान खरेदी केंद्रावरील धानाची त्वरीत उचल करण्यात यावी. बागायती पिके व भाजीपाला उत्पादकांना सुध्दा अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी.
आदी मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नावे तहसीलदारांना देण्यात आले. शिष्टमंडळात माजी आ. दिलीप बन्सोड, जागेश्वर निमजे, जि.प.सदस्य प्रिती रामटेके, उषा किंदरले, प्रदीप मेश्राम, संजय किंदरले, राजकुमार असाटी, डॉ.निम्रोद पटले, पप्पू सय्यद, मनिराम हिंगे, नितेश खोब्रागडे, देवेंद्र मंडपे, ग्यानीराम डोंगरवार, शंकर बिंज्ञाडे, निशा बावनकर, ममता लिचडे, मुकेश बरियकर, शिवदास पारधी, महेंद्र सुर्यवंशी, पारस रहांगडाले, भुमेश्वर पटले, राजेश पेशने, स्वप्नील बन्सोड, पोलेश्वर भगत, प्रल्हाद दखणे, खुशाल शहारे, सुर्यकांत टेंभरे, वसंत मडावी, कोठीराम निशाने, मुरलीदास गोंडाणे, सिलार्थ खोब्रागडे, देवगंना बघेले उपस्थित होते.