शासनाची फसवणूक मायलेकांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 11:22 PM2019-01-17T23:22:45+5:302019-01-17T23:23:23+5:30

ग्रामपंचायतच्या मालमत्ता रजिरस्टरमध्ये खोडतोड करुन आपल्या आईला घरकुलाचा लाभ मिळवून देणाऱ्या ग्रा.पं. परिचर व त्याच्या आई विरुद्ध नवेगावबांध पोलिसांनी बुधवारी (दि.१६) फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

Complaint against the government fraud Maylak | शासनाची फसवणूक मायलेकांवर गुन्हा दाखल

शासनाची फसवणूक मायलेकांवर गुन्हा दाखल

Next
ठळक मुद्देएकाच लाभार्थीला अनेकदा घरकुलाचा लाभ: सुपुत्राने केली दस्ताऐवजात खोडतोड

लोकमत न्यूज नेटवर्क
अर्जुनी-मोरगाव : ग्रामपंचायतच्या मालमत्ता रजिरस्टरमध्ये खोडतोड करुन आपल्या आईला घरकुलाचा लाभ मिळवून देणाऱ्या ग्रा.पं. परिचर व त्याच्या आई विरुद्ध नवेगावबांध पोलिसांनी बुधवारी (दि.१६) फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. विशेष उल्लेखनीय म्हणजे यासंदर्भात दैनिक लोकमतने अबब! एकाच व्यक्तीला चारदा घरकुलाचा लाभ मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करुन प्रशासनाला जागे केले होते.
येरंडी देवलगाव येथील शांता भिवा वाघाडे या महिलेने अनेकदा शासनाच्या घरकुल योजनेचा लाभ घेतला. या महिलेचा सुपुत्र विलास हा येरंडी ग्रा.पं.मध्ये परिचर आहे. सदर महिलेला २००४-०५ या वर्षात इंदिरा आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झाले. प्रथम झालेल्या बांधकामानुसार मुल्यांकन करुन त्यांना हप्ते अदा केल्याची नोंद शासकीय रोकडवहीत आहे. याच महिलेला परत २०११-१२ मध्ये याच योजनेचा लाभ देण्यात आला आहे. २०१५-१६ यार्वी सुद्धा इतर मागास प्रवर्गातून घरकुल मंजूर झाले होते. परंतु जाती विषयक दस्तावेज सादर न केल्यामुळे अनुदान वितरण करण्यात आले नाही. ही महिला अनु.जाती प्रवर्गाची असताना तिच्या कोणत्याही दस्ताऐवजांची शहानिशा न करता इतर मागास प्रवर्गातून प्रस्ताव मंजुरीसाठी गोंदियाच्या प्रकल्प संंचालकाकडे कसा पाठविण्यात आला होता. व तो प्रस्ताव मंजूर सुद्धा कसा झाला हे एक कोडेच आहे.सामाजिक, आर्थिक व जात सर्वेक्षणाच्या जनरेटेड प्रायोरिटी यादीमध्ये कच्चे घर म्हणून नमूद असल्याने परत पुन्हा २०१६-१७ या वर्षात प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ देण्यात आला. लाभार्थ्यांना अनेक घरकुल योजनांचा लाभ पोहोचविणामध्ये तिच्या सुपुत्राचाही तेवढाच सहभाग आहे. मालमत्ता रजिस्टर वारंवार घरकुलाचा लाभ मिळावा यासाठी पक्के घराऐवजी मातीचे घर अशी मालमत्ता रजिस्टर नमूना ८ मध्ये खोडतोड करण्याचा प्रकार या महिलेच्या सुपुत्राने केला. अशाप्रकारे या मायलेकांनी शासनाची फसवणूक केली. या संबंधाने येरंडी येथील प्रशांत तागडे यांनी माहितीच्या अधिकारात माहिती घेवून याप्रकरणी तक्रार केली होती.
अखेर याप्रकरणाच्या सखोल चौकशीनंतर स्थानिक पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नारायाप्रसाद रामजी जमईवार यांनी नवेगावबांध पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली. यावरुन नवेगावबांध पोलिसांनी आरोपी मायलेकांविरुद्ध ४२०, ४६६, ४६८, ४७१, ३४ भादंविचा गुन्हा नोंदविला आहे.
 

Web Title: Complaint against the government fraud Maylak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.