मायक्रोफायनान्स कंपन्यांविरूद्ध तक्रार
By Admin | Published: February 13, 2017 12:26 AM2017-02-13T00:26:09+5:302017-02-13T00:26:09+5:30
दवनीवाडा येथील महिलांनी मायक्रोफायनान्स कंपनी एस.के.एस., एल.एन.टी. ग्रामीण कोटा उत्कर्स, स्वलंबन
महिलांनी गाठले पोलीस ठाणे : कारवाई करण्याचे आश्वासन
परसवाडा : दवनीवाडा येथील महिलांनी मायक्रोफायनान्स कंपनी एस.के.एस., एल.एन.टी. ग्रामीण कोटा उत्कर्स, स्वलंबन, जनलक्ष्मी, हिंदुस्थान, रतनाकर, ग्रामीण इनसाफ, महिंद्रा, नाबार्ड, दिशा, उज्वल क्रेडीट व इतर कंपनीविरुद्ध दवनीवाडा पोलिसात तक्रार केली आहे. १५५ महिलांनी आपल्या स्वाक्षरीनिसी लेखी तक्रार दिली आहे.
सर्व मायक्रोफायनांस कंपन्यांच्या एजंटनी घरोघरी जाऊन महिलांना उलटसुलट सांगून बचत गट तयार करण्यास सांगितले. तसेच त्यांना २३ ते २८ टक्के व्याज दरात कर्ज दिले व त्यांच्याकडून अग्रीण रुपयेसुद्धा घेतले. आर.डी.सुद्धा वसूल करून महिलांची फसवणूक केली. महिला कर्ज घेत नसतानाही बचत समुहाला सर्व महिलांना बंधनकारक सांगून कर्ज पुरवठा केला. कोणतेही कागदपत्र न पुरवता आरबीआयसी परवाना सांगितले. महिलांना नोटबंदीच्या दरम्यान पैसे देऊ नका व जुने पैसे घेण्यास नकार दिला.
कंपनी नोटबंदीच्या दरम्यान पैसे घेत नाही म्हणजे कंपनी गैरप्रकार करीत असल्याचे महिलांच्या लक्षात आले. कर्ज वसुलीसाठी वेगवेगळे कर्मचारी कोणतेही ओळखपत्र न दाखवता येत होते. वसुलीसाठी येणे, पावती न देता उलट महिलांना धमकावणे, असे प्रकार घडले.
महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध त्यांनी सर्व मायक्रोफायनांसच्या विरोधात पोलीस निरीक्षक वामन हेमणे यांना तक्रार दिली.
यात हितेंद्र लिल्हारे, ममता जतपेले, गीता उके, दुर्गा सोलंकी, पुष्पलता जतपेले, योगेश्वरी नागपुरे, किर्ती दोनोडे आदिंचा समावेश आहे. या वेळी हेमणे यांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिले. (वार्ताहर)