जलयुक्त शिवाराची २२४५ कामे पूर्ण

By admin | Published: June 25, 2017 12:52 AM2017-06-25T00:52:53+5:302017-06-25T00:52:53+5:30

राज्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी तसेच भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी जलयुक्त शिवार अभियानाचा दुसरा टप्या सुरू करण्यात आला.

Complete the 2245 works of water tanker Shiva | जलयुक्त शिवाराची २२४५ कामे पूर्ण

जलयुक्त शिवाराची २२४५ कामे पूर्ण

Next

२९.८६ कोटी खर्च : जिल्ह्यातील ४२६ कामे प्रगतीपथावर
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : राज्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी तसेच भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी जलयुक्त शिवार अभियानाचा दुसरा टप्या सुरू करण्यात आला. सन २०१६-१७ या वर्षाचे ८५.०५ टक्के काम पूर्ण झाले. जिल्ह्यात आतापर्यंत २२४५ काम पूर्ण झाले असून ४२६ कामे प्रगतीपथावर आहेत.
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत दुसऱ्या टप्यात २०१६-१७ मध्ये ७७ गावांची निवड करण्यात आली होती. त्या गावांपैकी २६७१ काम सुरू करण्यात आले. यातील २३ जून पर्यंत २२४५ काम पूर्ण करण्यात आले. या कामांवर मार्च अखेरपर्यंत २९.८६ कोटी रूपये खर्च करण्यात आले.
जिल्ह्यात प्रत्येक नागरिकाला जल साक्षर करण्यासाठी तसेच जल समृध्दीतून आर्थिक समृध्दीसाठी कृषि विभागाद्वारे सुरू करण्यात आलेल्या विशेष अभियानाला नागरिकांचे सहकार्य मिळत आहे.
या अभियानाच्या दुसऱ्या टप्यात माती नालाच्या ९ बांधकामापैकी ५ काम पूर्ण झाले आहेत. गैबियन स्ट्रक्चरच्या २१२ पैकी २०९, समतल चराच्या ९२ पैकी ८५, माती नालाबांध दुरूस्ती व माती काढण्याच्या १०२ कामांपैकी ७१, साखळी सीमेंट बंधारे ७५ पैकी ३७ सिमेंट बंधारे, दुरूस्ती, माती काढण्याच्या १०४ पैकी ९२ कामे, नाला खोलीकरणाच्या २३३ पैकी १९६ कामे, केटी वेयर दुरूस्ती ६ पैकी ४, वनतळी ८ पैकी ४, भातखाचर १०१८ पैकी ९३९, बांधच्या ९ पैकी १, बोडी खोलीकरण व जून्या बोडीच्या दुरूस्तीच्या ४७० पैकी ४०५, तलाव खोलीकरण व दुरूस्तीच्या ६७ पैकी ४३, मामा तलाव दुरूस्तीच्या १०३ पैकी २७, लघु सिंचन तलाव दुरूस्तीच्या १८ पैकी ५ कामे, शेततळीच्या १२२ कामांपैकी ११७ तलाव खोलीकरण, तलाव दुरूस्ती सीएसआरचे १३ ही कामे पूर्ण झाले आहेत.
या अभियानांतर्गत आतापर्यंत करण्यात आलेल्या कामांवर २१ कोटी ८६ कोटी खर्च करण्यात आले आहेत. यात गैबियन स्ट्रक्चरवर २० लाख २ हजार, समतल चरावर ४३ लाख २ हजार, माती नाला बांधकामावर २१ लाख ४ हजार, साखळी सीमेंट बंधाऱ्यांवर १ कोटी ८४ लाख, सिमेंट बंधारे दुरूस्तीवर ७३ लाख, नाला खोलीकरणवर ४ कोटी ९६ कोटी, केटी वेयर ९ हजार, कालवा दुरूस्तीवर ४२ हजार, माती काढण्यावर ७३ हजार, वन तलावावर ७ हजार, भात खाचर दुरूस्तीवर ५ कोटी ९९ लाख, बंधारे दुरूस्तीवर ५१ लाख १ हजार, बोडी खोलीकरणवर ८९ हजार, तलाव खोलीकरणार १ कोटी ९२ लाख, मामा तालाव दुरूस्तीवर ९७ हजार, लघु सिंचन तलाव दुरूस्तीवर ७३ हजार, शेततळीवर १ कोटी ९९ लाख व तलाव खोलीकरण, दुरूस्ती, सीएसआरवर २४ हजार रूपये खर्च केले.
कृषि विभागाच्या १८०७ पैकी १५४८ काम पूर्ण करण्यात आले. २५९ कामे प्रगतीवर आहेत. जिल्हा परिषद लघु सिंचन विभागाचे १७२ पैकी ६४ काम पूर्ण झाले आहेत. परंतु १०८ कामे प्रगतीवर आहेत. पंचायत समितीच्या १५३ पैकी १४६ कामे झाले आहेत. ७ कामे प्रगती पथावर आहेत. वन विभागाच्या ५२२ पैकी ४७२ कामे पूर्ण झाली असून ५० कामे प्रगती पथावर आहेत. जलयुक्त शिवार अभियनामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी वाढत आहे. शेतकऱ्यांना सिंचनासाठी या योजनेची मदत होणार आहे.

तलावातील पाण्यामुळे अडेल उद्दीष्टपूर्ती
जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानाचे ८५.०५ टक्के काम पूर्ण करण्यात आले आहेत. ४२६ काम प्रगतीपथावर आहेत. परंतु उद्दीष्टपूर्ती करण्यासाठी तलावात भरला असलेला पाणी अडचण करीत आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत माती नाला बंधारे ४, गैबियन स्ट्रक्चर १२, समतल चर ७, माती नाला बंधारे दुरूस्ती ३१, साखळी सिमेंट बंधारे ३८, सिमेंट बंधारे दुरूस्ती १२, नाला खोलीकरण ३७, केटी वेयर दुरूस्ती २, कालवा दुरूस्ती २, माती काढणे सीएसआर ८, वन तलाव ४, भात खाचर ७१, पाणी भंडारण बंधारे ८, बोडी दुरूस्ती ६५ तलाव खोलीकरण २४, मामा तलाव खोलीकरण ७६, लघु सिंचन तलाव दुरूस्ती १३, शेततळी ५ कामे प्रतीपथावर आहेत. जलयुक्त शिवारामुळे बंधाऱ्यात पाणी भरला असल्यामुळे ती कामे करण्यासाठी समस्या होत आहे.

 

Web Title: Complete the 2245 works of water tanker Shiva

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.