कोरोना नियम पाळून कार्यक़्रम उरकावे ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:30 AM2021-04-04T04:30:02+5:302021-04-04T04:30:02+5:30

कोरोना काळातील निर्देशाप्रमाणे लग्नकार्य व इतर मांगलिक कार्यक्रम ५० लोकांच्या उपस्थितीत आणि अंत्यसंस्काराला २० लोक सहभागी होण्याची परवानगी ...

Complete the program by following the Corona Rules () | कोरोना नियम पाळून कार्यक़्रम उरकावे ()

कोरोना नियम पाळून कार्यक़्रम उरकावे ()

Next

कोरोना काळातील निर्देशाप्रमाणे लग्नकार्य व इतर मांगलिक कार्यक्रम ५० लोकांच्या उपस्थितीत आणि अंत्यसंस्काराला २० लोक सहभागी होण्याची परवानगी शासनाने दिली आहे. परंतु अनेक लोक या नियमाचे पालन न करता मांगलिक कार्यक्रमात मोठी गर्दी करीत असतात. अशात कोरोनाचा संसर्ग समूह स्वरुपात वाढू शकतो. सालेकसा येथे एका कुटुंबातील लग्न समारंभात नियमांची पायमल्ली करीत दीडशे ते दोनशे पेक्षा जास्त मंडळी एकत्रित झाल्याचे आढळले. या स्थळाला भेट देवून ठाणेदारानी साथरोग प्रतिबंधक कायदा १८९७ कलम ११ महाराष्ट्र कोवीड १९ विनियमन सदर कलमान्वये गुन्हा नोंद करुन तपासात घेतला आहे. त्या अनुषंगाने ठाणेदार प्रमोद बघेले यांनी आपल्या आवाहनात लोकांना नियमित मास्कचा वापर, सुरक्षित सामाजिक अंतर, सॅनिटायझर नियमित वापर करण्यास सांगितले.

Web Title: Complete the program by following the Corona Rules ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.