संगणकीकृत धान्य वाटपात सालेकसा जिल्ह्यात अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 09:40 PM2018-11-18T21:40:37+5:302018-11-18T21:41:00+5:30
२५ टक्के नागरिक निरक्षर त्यातच गरीब आदिवासीबहुल तालुका म्हणून ओळख असलेल्या सालेकसा तालुक्याची गणना नेहमी मागास तालुक्यात होत होती. पूर्वी स्वस्त धान्य दुकानातून शिधापत्रिकाधारकांना हक्काचे गहू, तांदूळ दर महिन्याला बरोबर मिळत नव्हते.
लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा : २५ टक्के नागरिक निरक्षर त्यातच गरीब आदिवासीबहुल तालुका म्हणून ओळख असलेल्या सालेकसा तालुक्याची गणना नेहमी मागास तालुक्यात होत होती. पूर्वी स्वस्त धान्य दुकानातून शिधापत्रिकाधारकांना हक्काचे गहू, तांदूळ दर महिन्याला बरोबर मिळत नव्हते. मात्र स्वस्त धान्य दुकानात पार्इंट आॅफ सेल (पीओएस) संगणीकृत प्रणालीव्दारे शिधापत्रिकाधारकांना स्वस्त धान्याचे वाटप सुरू झाल्याने आदिवासीबांधवाना सुध्दा नियमित धान्य मिळत आहे. संगणीकृत पध्दतीने धान्य वाटप करण्यात हा तालुका जिल्ह्यात अव्वल स्थानावर आहे.
सार्वजनिक धान्य वितरण प्रणाली आता संगणीकृत झाल्याने स्वस्त धान्य दुकानात सार्वजनिक वितरण प्रणालीत होणाऱ्या भ्रष्टाचार सुध्दा काही प्रमाणात कमी झाला आहे. संगणीकृत पीओएस प्रणालीमुळे हे शक्य झाले आहे. त्यामुळे प्रत्येक गरीब आदिवासी कुटूंबाला हक्काचे पोटभर जेवण उपलब्ध होत आहे. पीओएसच्या माध्यमाने धान्य वाटप करण्यात गोंदिया जिल्हा राज्यात अव्वल आहे.
आदिवासी, डोंगराळ भागात असलेल्या सालेकसा तालुक्यात वेळोवेळी इंटरनेटची समस्या निर्माण होत होती. मात्र जिल्हा पुरवठा विभागाने यावर सुध्दा मात करुन पीओएस प्रणालीची ९८.९ टक्के अंमलबजावणी केली.ही धान्य वाटप प्रणाली २०१७ पासून सुरु करण्यात आली. या अंतर्गत सालेकसा तालुक्यातील शंभर रेशन दुकानात पीओएस मशीनचा पुरवठा करण्यात आला आहे. यामुळे तालुक्यातील ९८.९ टक्के शिधापत्रिकाधारकांना नियमित व पुरेपूर धान्य वाटप होत आहे.
१६ हजार शिधापत्रिकाधारक
तालुक्यातील एकूण शिधापत्रिकांधारकांची संख्या १६ हजार २६४ असून त्यांना एकूण ८७ स्वस्त धान्य दुकानातून धान्याचे वाटप केले जाते. तसेच स्वस्त धान्य दुकानदारांसह एकूण १०३ ठिकाणी केरोसीन विक्री करणारे आहेत.
शासनामार्फत मिळणाºया अनुदान सोयी सुविधा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावे या हेतुने संगणीकृत धान्य वाटप प्रणालीचा अवलंब करण्यात आला आहे. यामुळे गरीब, आदिवासी व गरजू लोकांना त्यांच्या हक्काचे अन्न धान्य मिळण्यास मदत होत आहे.
- सी.आर.भंडारी, तहसीलदार, सालेकसा
स्वस्त दुकानातून मिळणारे धान्य दर महिन्याला नियमित मिळत असून माझ्या कार्डावरील धान्य मलाच मिळते. त्यामुळे शासनाने सुरु केलेली संगणीकृत धान्य वाटप पध्दती सर्व सामान्य गरीब लोकांसाठी हिताची ठरत आहे.
- आनंदराव पंधरे, शिधापत्रिकाधारक, पोवारीटोला.