गुरूही आध्यात्मिक व मनाचे तार जोडणारी संकल्पना (गुरू)
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:25 AM2021-07-25T04:25:06+5:302021-07-25T04:25:06+5:30
अर्जुनी-मोरगाव : परिस्थितीशी खंबीर होऊन जो यशाकडे वाटचाल करतो तो खरा शिष्य असतो. गुरूने दिलेल्या मार्गाने चला कारण गुरू ...
अर्जुनी-मोरगाव : परिस्थितीशी खंबीर होऊन जो यशाकडे वाटचाल करतो तो खरा शिष्य असतो. गुरूने दिलेल्या मार्गाने चला कारण गुरू हा एक शिक्षकच नसून शत्रू सुद्धा आपले गुरू असतात. कारण गुरू ही एक आध्यात्मिक व मनाचे तार जोडणारी संकल्पना आहे, असे मार्गदर्शन एसडीसी व जीएमबीच्या प्राचार्या वीणा नानोटी यांनी केले.
विद्यालयात आयोजित गुरुपौर्णिमा कार्यक्रमात त्या अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून संस्था सचिव अनिल मंत्री व पर्यवेक्षक मुकेश शेंडे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरस्वती मातेच्या छायाचित्राचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले. मंत्री यानी, विद्यार्थ्यांना गुरुपौर्णिमेचे महत्त्व व गुरू-शिष्याची जोड कशी असावी ते सांगीतले. आई हीच आपली पहिली गुरू असते कारण संस्कारावीना ज्ञान हे अपूर्ण असते. गुरू असा असावा की ज्याच्यामध्ये एखाद्याचे व्यक्तिमत्त्व घडविण्याचे सामर्थ्य असेल आणि शिष्य हा गुरूंच्या आज्ञेचे पालन करणारा असावा, असे सांगितले. याप्रसंगी साक्षी जिवानी व आदेश देशमुख या विद्यार्थ्यांनी गुरूप्रती मनोगत व्यक्त केले. संचालन करून आभार लीना मिसार यांनी मानले.