‘एक मूल-एक झाड’ संकल्पना राबवावी

By admin | Published: July 14, 2017 01:17 AM2017-07-14T01:17:52+5:302017-07-14T01:17:52+5:30

वाढती लोकसंख्या व पर्यावरणाचे असंतुलन ही गंभीर समस्या बनत चालली आहे.

The concept of 'one child-one tree' should be implemented | ‘एक मूल-एक झाड’ संकल्पना राबवावी

‘एक मूल-एक झाड’ संकल्पना राबवावी

Next

पी.बी.चन्ने : बालवन समृद्ध योजनेचा आरंभ
लोकमत न्यूज नेटवर्क
आमगाव : वाढती लोकसंख्या व पर्यावरणाचे असंतुलन ही गंभीर समस्या बनत चालली आहे. यामुळे सिमित कुटूंब व जास्तीत जास्त झाडे ही काळाची गरज बनली आहे. अशात ‘एक मूल-एक झाड’ ही संकल्पना प्रत्येकाने राबवली पाहिजे असे प्रतिपादन वन परिक्षेत्राधिकारी पी.बी. चन्ने यांनी केले.
तालुक्यातील ग्राम कुंभारटोली येथील ग्रामवन समितीच्यावतीने आयोजीत बालनवन समद्ध योजनेच्या शुभारंभ व वृक्षारोपण कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. उद्घाटन सरपंच सुनंदा येरणे यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक वन परिक्षेत्र अधिकारी एल.एस. भूते, वनरक्षक एस.एम. पवार, समिती अध्यक्ष अशोक बोकडे, पोलीस पाटील नर्मदा चुटे, ग्रामसेवक सुनील शिवणकर, तंटामुक्त समिती अध्यक्ष आशिष वैद्य, उपसरपंच निखिल मेश्राम उपस्थित होते. यावेळी ग्रामवन समिती मार्फत बालवन समृद्ध योजनेचा आरंभ करण्यात आला.
या योजने अंतर्गत १ जानेवारी ते ३१ जूनपर्यंत गावातील ज्या महिलेला पहिली मुलगी होईल त्या मुलीच्या नावाने समितीतर्फे १००० चा धनादेश देवून या योजनेचा आरंभ करण्यात आला. तसेच यावेळी समिती मार्फत गाव परिसरात १०० वृक्षांची लागवड करण्यात आली. कार्यक्रमासाठी समितीचे उपाध्यक्ष निरु फुले, सहसचिव भरत उईके, कैलास पतेह, मुकेश डोंगरे, रंजित गेडाम, विनोद पाऊलझगडे, ममता मेश्राम, अरुणा मेश्राम, रविता डोंगरे, सुस्मिता येटरे, इशांत सोनटक्के, स्वप्नील मेश्राम तसेच जि.प.हायस्कूल आणि अमृताबेन पटेल शाळेच्या शिक्षकांनी सहकार्य केले.

Web Title: The concept of 'one child-one tree' should be implemented

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.