‘एक गाव, एक गणपती’ची संकल्पना ५१९ गावांत
By Admin | Published: August 17, 2014 11:14 PM2014-08-17T23:14:39+5:302014-08-17T23:14:39+5:30
गणेशोत्सवादरम्यान होणारे वाद, मिरवणुकीत नाचण्याच्या कारणावरून उद्भवलेले क्षुल्लक गुन्हे गंभीर गुन्ह्यात परिवर्तीत होतात. यातून गावाची शांतता धोक्यात येते. ही शांतता अबाधित राखण्यासाठी
फलश्रुती : दंगलीने धगधगती सडक/अर्जुनी शांत
नरेश रहिले - गोंदिया
गणेशोत्सवादरम्यान होणारे वाद, मिरवणुकीत नाचण्याच्या कारणावरून उद्भवलेले क्षुल्लक गुन्हे गंभीर गुन्ह्यात परिवर्तीत होतात. यातून गावाची शांतता धोक्यात येते. ही शांतता अबाधित राखण्यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या पुढाकाराने एक गाव एक गणपतीची संकल्पना राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात यंदा ५५६ पैकी ५१९ गावात ही संकल्पना राबविली जात आहे.
२९ आॅगस्ट रोजी महाराष्ट्राचे लाडके दैवत असलेल्या गणरायाचे आगमन होत आहे. गोंदिया जिल्ह्यात यंदा ७४८ सार्वजनिक गणेश, चार हजार १८५ खासगी तर ५१९ गावात ‘एक गाव एक गणपती’ ची संकल्पना राबविली जाणार आहे. जिल्ह्यात एकूण पाच हजार ४५१ श्रींची स्थापना होणार आहे.
‘एक गाव, एक गणपती’ ही संकल्पना जिल्ह्याच्या प्रत्येक पोलीस ठाण्यांतर्गत राबविण्यात येत आहे. आमगाव तालुक्याच्या ५७ गावात एक गाव, एक गणपती, ६० ठिकाणी सार्वजनिक गणपती तर ४०० ठिकाणी खासगी मूर्ती स्थापन होणार आहे. सालेकसा पोलीस ठाण्यांतर्गत ५७ गावात एक गाव, एक गणपती, ६३ ठिकाणी सार्वजनिक तर १५५ ठिकाणी खासगी मूर्ती स्थापन होणार आहे.
गोंदिया शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तीन गावात एक गणपती, ८५ ठिकाणी सार्वजनिक मूर्ती तर एक हजार खासगी मूर्ती स्थापन करणार आहेत. रागनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन गावात एक गणपती, ४५ ठिकाणी सार्वजनिक गणेश तर ५५० ठिकाणी खासगी गणेश मूर्ती स्थापन होणार आहे.
गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या २७ गावांमध्ये एक गणपती, ३२ ठिकाणी सार्वजनिक गणेश तर १५० ठिकाणी खासगी गणेश मूर्तीची स्थापना करण्यात येणार आहे. रावणवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ३६ गावात एक गणपती, ५१ ठिकाणी सार्वजनिक तर २६० ठिकाणी खासगी मूर्ती स्थापन होणार आहे. गोरेगाव पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या ३६ गावात एक गणपतीची संकल्पना राबविली जात आहे. ४० ठिकाणी सार्वजनिक तर १५० ठिकाणी खासगी मूर्ती स्थापन करण्यात येणार आहे.
तिरोडा पोलीस ठाण्यांतर्गत ४२ गावांमध्ये एक गणपती, ५० ठिकाणी सार्वजनिक तर २५० ठिकाणी खासगी गणपती स्थापन केले जाणार आहे. गंगाझरी पोलीस ठाण्यांतर्गत २३ गावात एक गणपती, ४० ठिकाणी सार्वजनिक तर १५० ठिकाणी खासगी मूर्ती स्थापन होणार आहे. दवनीवाडा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या १९ गावात एक गणपती, १८ ठिकाणी सार्वजनिक तर ३० ठिकाणी खासगी गणेशमूर्ती स्थापन होणार आहेत. डुग्गीपार पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या ५८ गावात एक गणपती, ८१ ठिकाणी सार्वजनिक तर २६५ ठिकाणी खासगी गणेशमूर्ती स्थापन करण्यात येणार आहे.
देवरी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या ३६ गावात एक गणपती, ४० ठिकाणी सार्वजनिक तर १९५ ठिकाणी खासगी मूर्ती, चिचगड पोलीस ठाण्यांतर्गत ४९ गावात एक गणपती, ४८ ठिकाणी सार्वजनिक तर ३० ठिकाणी खासगी, अर्जुनी/मोरगाव पोलीस ठाण्यांतर्गत ३६ गावात एक गणपती, ४७ गावात सार्वजनिक तर ४३० ठिकाणी खासगी मूर्ती स्थापन होणार आहे. केशोरी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या २३ गावात एक गणपती, २२ ठिकाणी सार्वजनिक तर ३५ ठिकाणी खासगी गणेशमूर्ती स्थापन होणार आहेत.
नवेगावबांध पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या १५ गावात एक गणपती, २६ ठिकाणी सार्वजनिक तर १२५ ठिकाणी खासगी मूर्ती स्थापन केले जाणार आहेत.
महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या पुढाकाराने ५१९ गावात एक गाव एक गणपती, ७४८ ठिकाणी सार्वजनिक तर चार हजार १८५ ठिकाणी खासगी गणेशमूर्तीची स्थापना करणार आहेत. तंटामुक्त मोहीम सुरू होण्याअगोदर सडक/ अर्जुनी येथे मूर्ती विसर्जनादरम्यान हिंदू-मुश्लीम यांच्यात नेहमीच वाद होत असे. मात्र तंटामुक्त गाव समितीने दंगलीने हे धगधगते गावही शांत केले आहे.