माझी पोषणबाग विकसन मोहिमेची सांगता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:19 AM2021-07-19T04:19:35+5:302021-07-19T04:19:35+5:30
उमेद कार्यालयाच्या वतीने तालुक्यातील ग्रामसंघाच्या माध्यमातून ठिकठिकाणी माझी पोषणबाग निर्मिती करण्याचे अभियान तालुका व्यवस्थापक रेशीम नेवारे यांच्या मार्गदर्शनात राबविण्यात ...
उमेद कार्यालयाच्या वतीने तालुक्यातील ग्रामसंघाच्या माध्यमातून ठिकठिकाणी माझी पोषणबाग निर्मिती करण्याचे अभियान तालुका व्यवस्थापक रेशीम नेवारे यांच्या मार्गदर्शनात राबविण्यात आले. प्रभाग संघातील सहभागी महिलांना रोज ताजातवाना भाजीपाला सहज उपलब्ध होऊन, आहारात मिळावा म्हणून सर्वत्र पोषणबाग तयार करण्यात आल्या. महागावचे प्रभाग समन्वयक प्रवीण रामटेके यांच्या नेतृत्वात नवजीवन प्रभाग संघाच्या अध्यक्ष कल्पना बडवाईक, सचिव सारिका रामटेके, रेखा कोडापे, जोत्स्ना गजभिये, सामुदायिक कृषी व्यवस्थापक जितेंद्र नागरीकर, सामुदायिक मत्स्य व्यवस्थापक रीना रॉय, पशू व्यवस्थापक गुरुपाल बारसागडे यांच्या सहकार्याने ठिकठिकाणी पोषणबाग निर्मिती केली जात आहे.
त्यानुसार, पंचायत समितीचे वरिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी अशोक बरईकर, केंद्रप्रमुख बी. एन. बोरकर, प्रभारी मुख्याध्यापक पी. पी. चव्हाण, आर. एस. मुंगमोडे यांच्या उपस्थितीत महागाव येथील शाळेत सामुदायिक पोषणबाग तयार करून मोहिमेची सांगता करण्यात आली. यावेळी ग्रामसंघाच्या संगीता बडवाईक, हेमलता डोंगरवार, निर्मला नाकाडे, दुर्गा ठाकरे, सुंदरा कोल्हटकर, शोभा मेश्राम, संगीता फुलबांधे, मंगला उपरीकर, संध्या नगरधने, देवांगणा राऊत, जिजा गहाणे, ममता राऊत, सूचिता उपरीकर, कुसुम झोळे यांचा सहभाग लाभला.