आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2019 12:24 AM2019-03-10T00:24:26+5:302019-03-10T00:24:48+5:30
आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०१९ च्या अनुषंगाने जिल्ह्यात कुठेही अनुचित प्रकार घडू नये यादृष्टीने भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०१९ च्या अनुषंगाने जिल्ह्यात कुठेही अनुचित प्रकार घडू नये यादृष्टीने भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी केले.
लोकसभा निवडणुकीच्या पाशर््वभूमीवर शुक्रवारी (दि.८) जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात जिल्ह्यातील सर्व कार्यालय प्रमुखांची बैठक घेवून निवडणुकीसंदर्भात माहिती देताना त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजा दयानिधी, अपर जिल्हाधिकारी अशोक लटारे, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) एस.एन.चौधरी प्रामुख्याने उपस्थित होते. पुढे बोलताना डॉ.बलकवडे यांनी, लोकसभा निवडणुकीदरम्यान जिल्ह्यात रोकड व दारु च्या वाहतुकीवर कडक निर्बंध घालण्याच्या सूचना पोलीस प्रशासन व उत्पादन शुल्क विभागाला देण्यात आल्याचे सांगितले.
तसेच, आचारसंहिता लागू होताच पोलीस विभागाने कायदा व सुव्यवस्थेचा चोखपणे बंदोबस्त ठेवावा. धार्मिक स्थळांवर निवडणुकीचा प्रचार करण्यास पूर्णत: बंदी आहे. दुसऱ्याच्या नावावर मतदान करणे हा एक गुन्हा आहे. मतदान करण्याकरीता दिव्यांग व्यक्तीची जाण्या-येण्याची व्यवस्था प्रशासनाने करावी. निवडणूक प्रचारासाठी वापरण्यात येणारे लाऊडस्पीकर फक्त सकाळी ६ ते रात्री १० पर्यंत चालू राहील याची पोलीस विभागाने विशेष दक्षता घ्यावी असेही त्यांनी सांगीतले.
राजकीय पक्षांनी निवडणूक प्रचाराच्या ‘रोड शो’साठी पोलीस विभागाकडून परवानगी घेणे आवश्यक आहे. निवडणूक प्रचारादरम्यान प्लास्टीकचा वापर टाळायचा आहे. निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतर नविन कार्यक्र म सुरु करता येणार नाही याची सर्व विभागांनी दक्षता घ्यावी. निवडणुकीविषयी कुठलीही सभा होत असेल तर पोलीस विभागाची परवानगी घेणे आवश्यक आहे.
आचारसंहिता लागू होताच शासकीय होर्डींगवरील फ्लेक्स २४ तासांत काढून घ्यायचे आहेत, तर खाजगी क्षेत्रातील होर्डींगवरील फ्लेक्स ७२ तासांत काढायचे आहेत, अशी माहिती बैठकीत देण्यात आली. बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी हरिष धार्मिक तसेच जिल्ह्यातील सर्व कार्यालय प्रमुख उपस्थित होते.
अन्यथा अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई
बैठकीत आदर्श आचारसंहिता विषयक माहिती देताना डॉ. बलकवडे यांनी, लोकसभा निवडणूक शांततेच्या वातावरणात व निष्पक्षपणे पार पाडावी. आचारसंहितेत कोणत्याही अधिकाºयांनी राजकीय पदाधिकाºयांशी भेट घेवू नये, नाही तर त्यांच्यावर नियमानुसार योग्य ती कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सांगीतले.