प्लाझ्मा अँटिबाॅडी तपासणी, कोरोना चाचणी शिबिराचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:27 AM2021-05-17T04:27:11+5:302021-05-17T04:27:11+5:30
शासन निर्देशानुसार १५ मे नंतर अत्यावश्यक व इतरही दुकाने पूर्णवेळ उघडण्याबाबत निर्णय घेण्याच्या दृष्टीने सर्व व्यावसायिक दुकानदार व त्यांच्या ...
शासन निर्देशानुसार १५ मे नंतर अत्यावश्यक व इतरही दुकाने पूर्णवेळ उघडण्याबाबत निर्णय घेण्याच्या दृष्टीने सर्व व्यावसायिक दुकानदार व त्यांच्या दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आरटीपीसीआर चाचणी केलेली असणे आवश्यक आहे. सर्व व्यापारी वर्गाला सुविधा व्हावी या दृष्टीने रविवारी (दि.१६) गायत्री मंदिरात आरटीपीसीआर व अँटिजन टेस्ट चाचणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरासाठी डाॅ. राहुल बिसेन, माजी नगराध्यक्ष आशिष बारेवार, युवा शेतकरी टिटू जैन, प्रमोद मेश्राम, सामाजिक कार्यकर्ते विकास बारेवार, रेखलाल टेभंरे यांच्यासह संजीवनी फाउंडेशन व युवा शक्ती स्पोर्टस् क्लबच्या सदस्यांनी सहकार्य केले.