काँग्रेसचे ३० तर भाजपचे ४० हजार कोटींचे नियोजन
By admin | Published: May 28, 2017 12:07 AM2017-05-28T00:07:18+5:302017-05-28T00:07:18+5:30
देशात ६० वर्ष शासन करणाऱ्या काँग्रेसने शेतकरी व शेतीसंदर्भात १५ वर्षात ३१ हजार ५०० रुपये खर्च केले.
१५ वर्षांत नियोजन शून्य : अडीच वर्षात साधली प्रगती
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : देशात ६० वर्ष शासन करणाऱ्या काँग्रेसने शेतकरी व शेतीसंदर्भात १५ वर्षात ३१ हजार ५०० रुपये खर्च केले. परंतु आमच्या राज्य सरकारने अडीच वर्षात ४० हजार कोटी रुपयाचे नियोजन केले आहे. याशिवाय नैसर्गिक आपदेपासून सावरण्यासाठी ८ हजार कोटी रुपये खर्च केले आहे. परंतु काँग्रेस सरकारने ६ हजार ५०० कोटी रुपये खर्च केले आहे. शेतकऱ्यांना दुखावणारी काँग्रेस आता कर्जमाफीच्या नावावर भाजपला हिशेब मागत असल्याचे उद्गार आ. परिणय फुके यांनी काढले.
तालुक्यातील कारंजा, खमारी, बनाथर, दासगाव व कुडवा या पाच गावात आयोजित शिवार संवाद कार्यक्रमात ते बोलत होते.
काँग्रेस सरकारने १५ वर्षात पीक विम्यावर ४ हजार ६०० कोटी रुपये खर्च केले. परंतु भाजपचे अडीच वर्षात ६ हजार ७३९ कोटी रुपये खर्च केले आहे. शेतकऱ्यांना प्रगतशील करण्यासाठी आमचे प्रयत्न आहे. शेतकऱ्यांना कर्ज घेण्याची पाळीच येऊ नये अशी व्यवस्था करण्याचा आमचा माणस आहे. काही शेतकऱ्यांना जनावरांचा चारा, उत्पादन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. जलयुक्त शिवार योजना, मागेल त्याला शेततळी, पाणी अडवा, पाणी जिरवा, तलाव खोलीकरण, सौरउर्जा पंप, कृषी पंप, विद्युत कनेक्शन, शेतकऱ्यांना त्वरीत देण्यात येत आहे. या शिवाय शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी पिक विमा योजना देण्याची योजना केंद्र सरकारने सुरु केली. आपादग्रस्त शेतकऱ्यांना ८० टक्के नुकसान भरपाई देण्याचे प्रावधान भाजप सरकारने केल्याचे डॉ. परिणय फुके यांनी सांगीतले. कार्यक्रमाला भाजपचे महामंत्री बाळा अंजनकर, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल, नेतराम कटरे, छत्रपाल तुरकर, तालुकाध्यक्ष नंदू बिसेन, राजेश चतुर, न.प.उपाध्यक्ष शिव शर्मा, सुजित येवले उपस्थित होते.
यावेळी विनोद अग्रवाल यांनी शासनाच्या विविध योजना घराघरापर्यंत पोहचविण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाय योजनासंदर्भात मार्गदर्शन केले.
यावेळी मिताराम हरडे, अरविंद हरडे, सरपंच मंगला रणदिवे, मोहन गौतम, विजय रहांगडाले, सुभान रहांगडाले, अशोक चन्ने, डॉ. गौतम, गणेश धोटे, विठ्ठलराव हरडे, डॉ. संजू उके, दिनेश रहमतकर, शिवलाल ढेकवार, बंडू नागपुरे, कपूण रंगारी, देवेंद्र बघेले, पं.स.सदस्य मोरेश्वर रहांगडाले, चंद्रशेखर वाळवे, भोलाराम मेश्राम, माजी जि.प.सदस्य बुधराम चुटे, आत्माराम कोरे, मनोहर साखरे, सुभाष बावणकर, विष्णू हत्तीमारे, श्यामकला पाचे, जितलाल पाचे, क्रांतीकुमार चौव्हाण, सुशिल पाचे, बाबुलाल नागफासे, गांधी, मेश्राम, पाचे, तुरपन खैरवार, फुलचंद देवाधारी, प्यारे भाई, सुभाण भाई, तेमेश मरठे, दिपक दियेवार, सुर्यकांत नागफासे, दिनेश माने, छगन माने, आनंद वासनिक, पुरुषोत्तम डोहरे, सुखलाल बोपचे, गुनीराम सेवईवार, गोविंद तुरकर, दिनेश तुरकर, चुनेश तुरकर, पं.स.सदस्य रामराज खरे, ज्ञानेश्वर वैद्य, सुरेंद्र भगत, नितीन तुरकर, सचिन बडगुजर, दिपक गौतम, राजु सूर्यवंशी, मुन्ना पिल्लेवार, विलास गजभिये उपस्थित होते.