पटोले होऊ शकतात काँग्रेसचे उमेदवार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 09:47 PM2018-04-27T21:47:24+5:302018-04-27T21:47:24+5:30
साडेतीन वर्षांपूर्वी भाजपच्या उमेदवारीवर खासदार झालेले नाना पटोले हेच आता येत्या २८ मे रोजी होणाऱ्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार असण्याची शक्यता आहे. कोणत्याही पक्षाची अद्याप आघाडी किंवा युती झालेली नसली तरी सर्वच प्रमुख पक्ष आपआपल्या स्तरावर मोचेर्बांधणी करण्यात व्यस्त आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : साडेतीन वर्षांपूर्वी भाजपच्या उमेदवारीवर खासदार झालेले नाना पटोले हेच आता येत्या २८ मे रोजी होणाऱ्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार असण्याची शक्यता आहे. कोणत्याही पक्षाची अद्याप आघाडी किंवा युती झालेली नसली तरी सर्वच प्रमुख पक्ष आपआपल्या स्तरावर मोचेर्बांधणी करण्यात व्यस्त आहेत.
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची दोन्ही पक्षश्रेष्ठीकडून आघाडी होण्याची शक्यता आहे. परंतु शिवसेनेशी असलेल्या शीतसंघषार्मुळे युती होणार की नाही यामुळे भाजपमध्ये अस्वस्थता पसरली आहे. शेवटच्या क्षणी युती झाली तरीही उमेदवार हा भाजपचाच राहणार असल्यामुळे शिवसेना आज-उद्या कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भाजपचा उमेदवार कोण?
या पोटनिवडणुकीत भाजपचा उमेदवार कोण राहील? याबाबत उत्सुक्ता वाढलेली आहे. आ.परिणय फुके यांनी निवडणूक लढणार नसल्याचे स्पष्ट केल्यामुळे माजी आमदार खुशाल बोपचे, हेमंत पटले, आ.चरण वाघमारे यांची नावे सध्यातरी चर्चेत आहेत. भाजपसाठी ही पोटनिवडणूक अस्तित्त्वाची असल्यामुळे तुल्यबळ उमेदवार देण्यासंदर्भात भाजपात विचारमंथन सुरू आहे. सर्वच पक्षांच्या उमेदवारांचे अंतिम चित्र येत्या दोन तीन दिवसात स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादीत पटेलांचा निर्णय सर्वमान्य
दरम्यान, शुक्रवारी (दि.२७) दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाºयांची गोंदिया येथे बैठक झाली. या बैठकीत पदाधिकाºयांनी आपआपली मते मांडली. ही पोटनिवडणूक राष्ट्रवादीनेच लढवावी असा काहींनी आग्रह धरला. परंतु सरतेशेवटी पक्षश्रेष्ठी प्रफुल्ल पटेल हे जो निर्णय घेतील तो सर्वांना मान्य राहील, यावर सर्वांचे एकमत झाले. आता दिल्लीत काय ठरते? आणि खा. प्रफुल्ल पटेल कोणता निर्णय घेतात, यावर सर्व अवलंबून असल्याचे सूत्राने सांगितले. या बैठकीत माजी आमदार राजेंद्र जैन, दिलीप बन्सोड, नाना पंचबुद्धे, मधुकर कुकडे, माजी जि.प. अध्यक्ष विजय शिवणकर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे, धनंजय दलाल, नरेश माहेश्वरी यांच्यासह काही सभापती, जि.प. सदस्य,नगरसेवक उपस्थित होते.
काँग्रेसचा अहवाल सादर
जागा वाटपाच्या सूत्रानुसार हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. राजीनाम्यानंतर ही निवडणूक नाना पाटोले यांनीच लढवावी,असा भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा आग्रह होता. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना नागपूरला पाठवून पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतली होती. त्यानंतर विखे यांनी हा अहवाल प्रदेशाध्यक्षांकडे सादर केला.
ठाकरेंनी जाणून घेतली मते
पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आठ दिवसांपूर्वी भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेण्यासाठी त्यांना मातोश्रीत बोलाविले होते. या बैठकीत खासदार अनिल देसाई, ना.एकनाथ शिंदे, दिवाकर रावते, संपर्कप्रमुख निलेश धुमाल, भंडारा जिल्हाप्रमुख राजेंद्र पटले, गोंदिया जिल्हाप्रमुख मुकेश शिवहरे व राजकुमार कुथे हे होते. यावेळी शिवसेना स्वतंत्र लढणार असल्याचे स्पष्ट करून पदाधिकाºयांना कामाला लागण्याचे आदेश दिले. त्यामुळे सेनेकडून ही पोटनिवडणूक लढल्या जाण्याची शक्यता आहे.