गोंदिया कृषी उत्पन्न बाजार समितीवर चाबी-काँग्रेसचे वर्चस्व
By अंकुश गुंडावार | Published: April 29, 2023 03:18 PM2023-04-29T15:18:25+5:302023-04-29T18:05:07+5:30
१८ पैकी १३ जागांवर विजय, भाजप-राष्ट्रवादीचे पानीपत
अंकुश गुंडावार, गोंदिया : संपूर्ण गोंदिया जिल्हावासीयांचे लक्ष लागून असलेल्या गोंदिया कृषी उत्पन्न बाजार समितीवर चाबी व काँग्रेस समर्थीत परिवर्तन पॅनलने वर्चस्व स्थापन करुन १७ पैकी १३ जागांवर विजय प्राप्त केला आहे. भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस समर्थीत सहकार पॅनलला केवळ तीन जागावर समाधान मानावे लागले.
चाबी संघटनेचे प्रमुख आ. विनोद अग्रवाल यांच्या मार्गदर्शनात लढविण्यात आलेल्या परिवर्तन पॅनलच्या विजयी संचालकांमध्ये धनंजय तुरकर, भाऊराव ऊके, मुनेश रहांगडाले, जितेश टेंभरे, पप्पू पटले, अरुण गजभिये, शामकला पाचे, मुरली नागपुरे, कौशल तुरकर आदींचा समावेश आहे. तर तीन जागांचा निकाल जाहीर होणे बाकी आहे. विशेष म्हणजे माजी आ.गोपालदास अग्रवाल, माजी आ. राजेंद्र जैन यांच्या नेतृत्वात भाजप -राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहकार पॅनलला केवळ तीन जागांवर समाधान मानावे लागले. सहकार पॅनलचे धनलाल ठाकरे यांची पुर्वीच बिनविरोध निवड झाली आहे. बाजार समिती निवडणुकीच्या निकालानंतर आ.विनोद अग्रवाल यांनी समर्थकांसह विजयोत्सव साजरा केला.