इंधन दरवाढी विरोधात काँग्रेसची निदर्शने ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:37 AM2021-06-09T04:37:16+5:302021-06-09T04:37:16+5:30
तिरोडा : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार तिरोडा तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने तालुका अध्यक्ष ...
तिरोडा : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार तिरोडा तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने तालुका अध्यक्ष राधेलाल पटेल यांच्या नेतृत्वात शहर अध्यक्ष ठमेंद्रसिंह चव्हान यांच्या उपस्थितीत इंधन दरवाढीच्या विरोधात सोमवारी (दि.७) येथील पेट्रोल पंपासमोर निदर्शने करण्यात आले.
केंद्र शासनाने डिझेल, पेट्रोलवर केंद्रीय उत्पादन शुल्क भरमसाठ वाढवून भरमसाठ दर वाढविले आहेत. पेट्रोल १०० रुपये तर डिझेल ९२ रुपयांवर पोहचले आहे. मोदी सरकार सर्वसामान्य जनतेवर भार देऊन स्वतःची लाखो कोटी रुपयांची कमाई करीत असल्याचा आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला. या दरवाढीचा निषेध तिरोडा तुमसर मार्गावरील पेट्रोल पंप व चंद्रभागा नाक्यावरील पेट्रोल पंपासमोर निदर्शने करुन नोंदविला. शोभेलाल दहिकर, गिरधर बिसेन, रामलाल राहंगडाले, भूमेश्वर पारधी, शैलेश कुमार मोहारे, संजय खियानी, बबलू राहंगडाले, भूमेश्वर यादव, संजय जांभुळकर, दीपक नंदेश्वर, किरण श्रीपतरी, दामू येरपुडे, रोशन लिल्हारे, राजेश ताडेंकर, दिलीप ढाले, विक्रम पटले, प्रशांत पटले, रमेश कुमार मडावी, पवन मोरे, महामंत्री शिवा यादव, सलाम भाई, शेख जुनैद खान, पूनम राहंगडाले, बबलू राहंगडाले, दुर्गा कटरे, माणिक झंझाड, रोशन बोरकर, राधेश्याम नागपुरे, विजय खोब्रागडे, रमाकांत खोब्रागडे आदी सहभागी झाले होते.