पेट्रोल, डिझेल दरवाढीविरोधात पेट्रोलपंपासमोर काँग्रेसची निदर्शने ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:37 AM2021-06-09T04:37:14+5:302021-06-09T04:37:14+5:30
आमगाव : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार आमगाव तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आमदार सहषराम कोरोटे यांच्या नेतृत्वात सोमवारी (दि. ...
आमगाव : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार आमगाव तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आमदार सहषराम कोरोटे यांच्या नेतृत्वात सोमवारी (दि. ७) केंद्र शासनाच्या पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ निदर्शने करण्यात आली, तसेच दरवाढ मागे घेऊन महागाई नियंत्रणात आणण्याची मागणी करण्यात आली.
डिझेल, पेट्रोलवर केंद्रीय उत्पादन शुल्क वाढवून भरमसाठ दर वाढविले आहेत. पेट्रोल १००, तर डिझेल ९२ रुपयांच्या वर पोहोचले आहे. मोदी सरकार सर्वसामान्य जनतेच्या खिशावर घाला घातला. स्वतः लाखो कोटी रुपये कमाई करीत आहे. डिझेल, पेट्रोलचे भाव वाढले म्हणून व केंद्र सरकारने भाव कमी करावे या मागणीसाठी सोमवारी सालेकसा मार्गावरील असाटी पेट्रोलपंप व सोना टाकीजजवळील अग्रवाल पेट्रोलपंपाजवळ निदर्शने करण्यात आली. मोदी सरकारच्या विरोधात घाेषणा देण्यात आल्या. यावेळी काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष संजय बहेकार, महिला तालुकाध्यक्ष छबूताई उके, अनुसूचित जातीचे जिल्हा महासचिव इसूलाल भालेकर, ओबीसी विभागाचे जिल्हा महासचिव जगदीश चुटे, शहराध्यक्ष अजय खेतान, महिला काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रभादेवी उपराडे, सुषमा बोपचे, संघटक महेश उके, ओबीसी विभागाचे तालुकाध्यक्ष भय्यालाल बावनकर, किसान आघाडीचे तालुकाध्यक्ष गणेश हुकरे, यादोराव भोयर, भोला गुप्ता, नरेश बोपचे, भूमेश्वर मेंढे, रामदास गायधने, नंदू कोरे, इंदल पाथोडे, नरेंद्र बागडे, दीपक शर्मा, प्रवीण खोटेले, भूमेश्वर फुंडे, श्याम देशमुख व सर्व काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.