शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कॉग्रेसची धाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2017 01:40 AM2017-04-03T01:40:39+5:302017-04-03T01:40:39+5:30
उत्तरप्रदेशातील शेतकऱ्याचे पिक कर्ज माफ करण्याच्या प्रक्रियेसोबत महाराष्ट्रातील आमगाव-देवरी विधानसभा
निवेदन सादर : कर्जमुक्त करण्याची मागणी
देवरी : उत्तरप्रदेशातील शेतकऱ्याचे पिक कर्ज माफ करण्याच्या प्रक्रियेसोबत महाराष्ट्रातील आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांचे पीक कर्ज पूर्ण माफ करण्यात यावे, शासनातर्फे घोषीत दुष्काळ निधीचे त्वरीत करावे, सावकारी कर्जमुक्त योजनेची अंमलबजावणी योग्यरित्या करून या क्षेत्रातील शेतकऱ्यांना मदत करावी या मागणीचे निवेदन शनिवार (दि.१) ला येथील उपविभागीय अधिकारी एम.एच.टोणगावकर यांच्या मार्फत राज्याचे राज्यपाल व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर केले.
माजी आ. रामरतन राऊत, गोंदिया जिल्हा काँग्रेसतर्फे महासचिव सहषराम कोरोटे यांच्या नेतृत्वात शेकडो काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते व शेतकऱ्यांनी निवेदन सादर ककेले. सदर निवेदनात काँग्रेस पक्षाने म्हटले आहे की, ज्याप्रमाणे उत्तरप्रदेशातील विधानसभेच्या निवडणूकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेथील शेतकऱ्यांचे पीक कर्ज पूर्ण माफ करण्याची घोषणा केली. होती आणि या मुद्यावर उत्तरप्रदेशात सरकार स्थापनेनंतर कर्ज माफ करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. याच धर्तीवर महाराष्ट्रातही भाजप प्रणीत पक्षाचे सरकार असल्याने या राज्यात सुध्दा शेतकऱ्याचे पीक कर्ज पूर्ण माफ करावे आणि शासनाद्वारे मागच्या वर्षी गोंदिया जिल्ह्यातील आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्रातील ८६ गाव दुष्काळग्रस्त घोषीत करून त्यांना मदत करीत असल्याचा गाजावाजा करण्यात आला होता. परंतु ही मदतनिधी आजपर्यंत ८६ गावातील एकाही शेतकऱ्याला मिळाली नाही. दुष्काळ निधीचे त्वरीत वाटप करावे तसेच शासनाने राज्यातील सावकारांच्या तावडीतून शेतकऱ्यांना वाचविण्याकरीता सावकारी कर्जमुक्त योजना सुरू केली. परंतु या योजनेची अंमलबजावणी या विधानसभा क्षेत्रात अद्याप करण्यात आली.या तिन्ही विषयावर शासनाने गंभीररित्या विचार करून येथील शेतकऱ्यांना त्वरीत मदत करावी, अशी मागणी केली. १५ दिवसात सदर मागणी पूर्ण न झाल्यास येत्या दिवसात काँग्रेस पक्षातर्फेतिव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात देवरी तालुक्यातील शेकडो काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकऱ्यांनी माजी आ. रामरतन राऊत, गोंदिया जिल्हा काँग्रेसचे महासचिव सहषराम कोरोटे, देवरी तालुका काँग्रेस अध्यक्ष संदीप भाटीया, जि.प.सदस्य माधुरी कुंभरे, पं.स. उपसभापती संगीता भेलावे, आदिवासी विकास महामंडळाचे संचालक भरतसिंग दुधनाग, अॅड. प्रशांत संगीडवार, राधेश्याम बगडीया, तालुका काँग्रेस उपाध्यक्ष वसंत पुराम, महासचिव बळीराम कोटवार, नरेश राऊत, धनपत भोयर, उपाध्यक्ष चैनसिंग मडावी, एन.एस.यु.आयचे अध्यक्ष अमित तरजुले, वैभव जैन, अविनाश टेंभरे, संदीप मोहबीया, देवरी एनएसयुआई उपाध्यक्ष उमेश चन्ने, गौतम वैद्य, मानिकाबापू आचले, सोनू नेताम, सुरज गिरी, उमेश धानगाये, दिगंबर चौधरी, ओमराज बहेकार, गणेश भेलावे यांच्यासह देवरी तालुक्यातील शेकडो काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी महिला पुरुषांचा समावेश होता. (प्रतिनिधी)