जिल्ह्यातील पुरातन वृक्षांचे संवर्धन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2017 12:14 AM2017-06-07T00:14:30+5:302017-06-07T00:14:30+5:30

गोंदिया जिल्हा हा नैसर्गीकदृष्टया संपन्न आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वनराई आहे. जिल्ह्यात काही शेतकऱ्यांच्या शेतीच्या....

Conserve antique trees in the district | जिल्ह्यातील पुरातन वृक्षांचे संवर्धन करा

जिल्ह्यातील पुरातन वृक्षांचे संवर्धन करा

googlenewsNext

राजकुमार बडोले : जागतिक पर्यावरण दिन कार्यक्र म
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : गोंदिया जिल्हा हा नैसर्गीकदृष्टया संपन्न आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वनराई आहे. जिल्ह्यात काही शेतकऱ्यांच्या शेतीच्या बांधावर पुरातन ५० ते १०० वर्ष जूने वृक्ष आहे, त्या वृक्षांचे जतन करु न त्यांचे संवर्धन करावे, असे मत पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी व्यक्त केले.
सोमवारी (दि.५) जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने नवेगावबांध जलाशय परिसराला दिलेल्या भेटीदरम्यान ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे, माजी जि.प.सभापती उमाकांत ढेंगे, सहायक वनसंरक्षक उदापुरे, वनपरिक्षेत्र अधिकारी खान, रहांगडाले, उपअभियंता समीर बन्सोड, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे नागपूर येथील वास्तू विशारद भिवगडे, विनोद नाकाडे प्रामुख्याने उपस्थित होते.
नामदार बडोले यांनी, अलिकडच्या काळात वृक्षतोडीमुळे पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे पर्यावरणाचे संतूलन बिघडत आहे. पर्यावरण संवर्धन हे मोठे आव्हान आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करु न त्या वृक्षांचे संवर्धन करण्याची आज गरज आहे. शासनाने ५० कोटी वृक्ष लागवड करण्याचा कार्यक्र म हाती घेतला असून यावर्षी चार कोटी झाडे लावण्याचा संपल्प केला आहे. जिल्ह्यात निसर्ग संपदा समृध्द आहे. परंतू ही निसर्ग संपदा पुढील पिढीसाठी टिकवून ठेवणे गरजेचे आहे. जिल्ह्यात नाविण्यपूर्ण योजनेतून जिल्हा प्रशासनाने एक नाविण्यपूर्ण उपक्र म आखलेला असून या उपक्र माद्वारे ज्या शेतकऱ्यांच्या बांधावर पुरातन ५० ते १०० वर्ष जूने वृक्ष आहे त्या शेतकऱ्यांनी हे वृक्ष जतन करु न ठेवावे. या उपक्र मातून शेतकऱ्यांना पुरातन वृक्षांचे जतन करण्यासाठी दरवर्षी एक हजार रु पये देण्याची योजना जाहीर करण्यात आली आहे.
या नाविण्यपूर्ण योजनेत शेतक ऱ्यांना वन्य पशूपक्षी व पर्यावरण संतूलन यासाठी उपयुक्त अशा ५० ते १०० वर्ष वयाच्या वृक्षांचे जतन करण्यासाठी जास्तीत जास्त १० वृक्षांपर्यंत सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे.
या वृक्षांमध्ये मात्र परदेशी वृक्ष जसे- निलगीरी, पेल्टाफोरम, रेनट्री, सप्तपर्णी असे वृक्ष असेल तर मदत मिळणार नाही. तसेच ज्यापासून चांगले आर्थिक उत्पन्न मिळत आहे असे- मोह, सागवान या वृक्षांना अनुदान मिळणार नाही.
जे भारतीय वृक्ष आहे उदा. चिंच, आंबा, जांभूळ, अंजन, धावडा, बेहडा, हिरडा, पळस इत्यादी सर्व वृक्षांना हे अनुदान लागू राहणार आहे. जे भारतीय प्रजातीचे मोठे उंच पुरातन वृक्ष आहे त्याची गणना करण्याचे काम वन विभागामार्फत सुरु आहे. या गणनेमध्ये शेतकऱ्यांनी आपले पुरातन वृक्ष नोंदविले जातील याची काळजी घ्यावी.
या उपक्र माची शेतकऱ्यांना जास्तीत जास्त माहिती होवून त्यांनी सर्वत्र आपल्या झाडाची नोंद वन विभागाकडे करावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

यावेळी नामदार बडोले यांनी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्यावतीने नवेगावबांध जलाशय परिसरात बांधण्यात येत असलेल्या रिसॉर्टच्या कामाची पाहणी केली. जवळपास १० डिलक्स रु म, २ लोक निवास प्रत्येकी १० व्यक्तींच्या क्षमतेचे बांधण्यात येणार आहे. हे रिसॉर्ट 5 हेक्टर क्षेत्रात बांधण्यात येणार असून यावर आठ कोटी रु पये खर्च होणार आहे. यावेळी त्यांनी जलाशय परिसरात बांधण्यात येत असलेल्या बीचचीही पाहणी केली. पाच कोटी पर्यंत येथे आणखी पर्यटन विकास कामे करण्याचे प्रस्ताव तयार करावे अशी सूचनाही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना यावेळी केली.

Web Title: Conserve antique trees in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.