दिलासा....६६४ चाचण्या पॉझिटिव्ह शून्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:31 AM2021-09-26T04:31:25+5:302021-09-26T04:31:25+5:30
गोंदिया : कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने शनिवारी (दि.२५) ६६४ चाचण्या करण्यात आल्या. यात एकही नमुना कोरोना पॉझिटिव्ह आला नाही. त्यामुळे ...
गोंदिया : कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने शनिवारी (दि.२५) ६६४ चाचण्या करण्यात आल्या. यात एकही नमुना कोरोना पॉझिटिव्ह आला नाही. त्यामुळे कोरोना बाधितांची संख्या सात स्थिर होती. मागील तीन-चार दिवसापासून कोरोनाबाधितांच्या संख्येला पूर्णपणे ब्रेक लागल्याचे चित्र आहे.
कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने शनिवारी ६६४ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यात ६२८ नमुन्यांची आरटीपीसीआर तर ३६ नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यात एकही नमुना कोरोनाबाधित आला नाही. त्यामुळे कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट शून्य होता. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत ४,५३,७५० नमुन्यांची चाचणी करण्यात आली आहे. यात २,३३,०३२ आरटीपीसीआर आणि २,२०,७१८ नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यात ४१,२२० नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले. यापैकी ४०,५०६ बाधितांनी कोरोनावर मात केली. सद्यस्थितीत सात कोरोना ॲक्टिव्ह आहेत.
.......
अजूनही धोका टळलेला नाही
कोरोना जरी आटोक्यात असला तरी धोका अद्यापही पूर्णपणे टळलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांकडे दुर्लक्ष न करता मास्क, सॅनिटायझरचा नियमित वापर करावा. नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज आहे.
..............
तिसरी लाट नाही, पण प्रशासन अलर्ट
कोरोनाचा संसर्ग जिल्ह्यात आटोक्यात असून, कोरोनामुक्तीच्या दिशेने जिल्ह्याची वाटचाल सुरू आहे. तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात असल्याने प्रशासन अलर्ट मोडवर असून, आराेग्यविषयक सर्व सुविधांचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला असून, आरोग्य यंत्रणेला सज्ज राहण्याच्या सूचना केल्या आहेत.