विधानसभा क्षेत्र चार, मात्र नाही एकही महिला उमेदवार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2024 04:29 PM2024-10-29T16:29:16+5:302024-10-29T16:30:08+5:30

राजकीय पक्षांकडून महिलांशी दुजाभाव : बोलण्यासाठीच फक्त महिला राज

Constituency four, but not a single woman candidate | विधानसभा क्षेत्र चार, मात्र नाही एकही महिला उमेदवार

Constituency four, but not a single woman candidate

कपिल केकत 
लोकमत न्यूज नेटवर्क 
गोंदिया :
आजची महिला अबला नसून सबला झाली आहे, असे भाषण देणारे मोठाले नेते मात्र खुद्द महिला शक्तीवरच विश्वास ठेवत नसल्याचे जिवंत उदाहरण गोंदिया जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीत दिसून येत आहे. चार विधानसभा मतदारसंघ असलेल्या या जिल्ह्यात महायुती व महाविकास आघाडीने आपले उमेदवार जाहीर केले असून, त्यात एकाही महिला उमेदवाराला संधी दिलेली नाही. यातून राजकीय पक्षांकडूनच महिलांसोबत दुजाभाव केला जात असल्याचे स्पष्ट होते.


आजची महिला प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करीत आहे. यात राजकारणही सुटलेले नाही. लोकसभा ते विधानसभा तेथेही महिला महत्त्वाची पदे भूषवित आहेत. विशेष म्हणजे, राजकारणात महिलांना ५० टक्के आरक्षणावर शिक्कामोर्तब झाले असून, पुढील निवडणुकीत ते लागू होणार आहे. मात्र, आता राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहात असून, या निवडणुकीत महिलांसोबत राजकीय पक्षांकडूनच दुजाभाव करण्यात आल्याचा प्रकार जिल्ह्यात घडला आहे. जिल्ह्यातील चारही विधानसभा क्षेत्रातील उमेदवारांचे चेहरे आता स्पष्ट झाले आहेत. महायुती व महाविकास आघाडीने आपली यादी जाहीर केली असून, त्यांच्या उमेदवारांनी अर्ज भरण्यास सुरुवातही केली आहे. येथे मात्र चारही विधानसभा क्षेत्रात त्यांनी एकही महिला उमेदवार दिलेला नाही. विशेष म्हणजे, भाजपने मागील निवडणुकीत पराजीत दोघांना पुन्हा संधी दिली. पण एकाही महिला उमेदवाराला संधी दिली नाही, तर काँग्रेसचीसुध्दा हीच स्थिती आहे. 


उच्च दर्जाचे राजकारण फक्त दिग्गजांच्या घराण्यापुरतेच 
राज्यातील राजकारणात महिलांची संख्या कमी आहे, असे काही नाही. महिलाही विधानसभेत आपले क्षेत्र गाजवत आहेत. मात्र, त्यात सामान्य स्तरावरील महिलेला संधी देण्यात आली असे क्वचितच बघावयास मिळते. लोकसभा म्हणा वा विधानसभा दिग्गज नेत्यांची मुलगी, सून, पत्नी यांनाच संधी दिली जात असल्याचे हमखास दिसून येते. महिलांसाठी फक्त स्थानिक स्तरावर राजकारण उरले आहे, तेही आरक्षणामुळे हेही येथे सांगणे गरजेचे आहे.


लाभल्या दोनच महिला आमदार
जिल्ह्यात आमगाव व गोंदिया या दोन मतदार- संघाला फक्त दोन महिला आमदार लाभल्या आहेत. यामध्ये आमगाव विधानसभा क्षेत्रात सन १९५७मध्ये सुशीलाताई इंगळे यांनी क्षेत्राचे प्रतिनिधित्व केले, तर गोंदिया विधानसभा क्षेत्रात १९७८मध्ये राजकुमारी बाजपेई यांनी क्षेत्राचे प्रतिनिधीत्व केले. मात्र, त्यांच्यानंतर महिलांना जिल्ह्यात संधी मिळालेली नाही. राष्ट्रीय दर्जाच्या पक्षांकडून तर तिकीट देण्यात आली नसल्याचे दिसते

Web Title: Constituency four, but not a single woman candidate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.