राज्यघटनेची निर्मिती बलशाली भारतासाठीच

By admin | Published: May 18, 2017 12:18 AM2017-05-18T00:18:46+5:302017-05-18T00:18:46+5:30

स्पर्धेच्या काळात भारत एक बलशाली राष्ट्र व्हावे ही संकल्पना मनात बाळगून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेची निर्मिती केली.

Constitution of the Constitution is for a strong India | राज्यघटनेची निर्मिती बलशाली भारतासाठीच

राज्यघटनेची निर्मिती बलशाली भारतासाठीच

Next

किशोर : बुद्ध जयंती महोत्सव उत्साहात
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : स्पर्धेच्या काळात भारत एक बलशाली राष्ट्र व्हावे ही संकल्पना मनात बाळगून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेची निर्मिती केली. परंतु इथल्या मनुवादी व्यवस्थेने हे साकार होऊ दिले नाही. ही उणीव बौद्धांनी भरुन काढावी, असे आव्हान ज्येष्ठ प्रबोधनकार इंजि. किशोर यांनी केले.
येथील भीमनगरच्या मैदानावर आयोजित बुद्धजयंती महोत्सवात ते प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करीत होते. अध्यक्षस्थानी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्व जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अरविंद साखरे होते. मंचावर वन अधिकारी आनंद मेश्राम, समाज कल्याण अधिकारी राजेश रामटेके, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे महाव्यवस्थापक विलास वासनिक, प्रा. प्रिया शहारे, नरेंद्र मेश्राम उपस्थित होते.
याप्रसंगी धर्मग्रंथांची ओळख पटवून देताना इंजि. किशोर पुढे म्हणाले की, जगाच्या पाठीवर ख्रिश्चन धर्माचे होली बायबल, कम्युनिझमचे दास कॅपीटल आणि इस्लामचे कुराण हे पवित्र गं्रथ म्हणून ओळख आहे. धार्मिक चळवळीमध्ये जगात बौद्धांचा धर्मग्रंथ म्हणून ‘भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म’ हा ग्रंथ एकच असावा. यामुळेच भारत बौद्धमय करण्याचा संकल्प डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा होता. त्यामुळे बौद्धांनी नैतिकतेची उपासना करावी असे सांगून बुद्धाचे आंदोलन म्हणजे क्रांती असून सामाजिक, आर्थिक परिवर्तनीय आंदोलन होय असे ते म्हणाले.
यावेळी बोलतना समाजकल्याण अधिकारी रामटेके यांनी जनगणनेच्यावेळी बौद्ध लिहिण्याची विनंती केली. परंतु बौद्ध लिहिण्याबरोबरच बुद्धाची शिकवण अंगीकार करुन आचरणात आणण्याची गरज आहे असे ते म्हणाले. हा कार्यक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्व. जयंती उत्सव समितीच्यावतीने आयोजित करण्यात आला होता. नागपूरच्या आॅकेस्ट्राने बुद्धगीतांचा नजराना पेश केला. यावेळी भोजनदानाचा कार्यक्रम आयोजित करुन समाजसेवकांचा सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविक अध्यक्ष अरविंद साखरे यांनी मांडले. संचालन डॉ. राजेश उके यांनी केले. आभार सुनील भरने यांनी मानले. कार्यक्रमासाठी एस.जी. वाघमारे, दीपक (बाबा) वाहने, दिपक घरडे, दलेश नागदवने, ललीत गोंडाणे, एम.पी. भेलावे, आनंद बन्सोड, अ‍ॅड. एकता गणवीर, जे.सी. बागडे, अरविंद सूर्यवंशी, मिलींद पानतावने, अनिल मेश्राम, प्रविण कांबळे, विपूल उके, रोशन कावळे, सुनील गणवीर, मनोज खोब्रागडे, पंकज वासनिक, सुशील गणवीर, सुनील डोंगरे, सुनील गणवीर, कमलेश उके, राजू कडबे, स्नेहा गडपायले, सिद्धार्थ चंद्रीकापुरे, नीलम मेश्राम, नुरलाल उके, सुरेश रंगारी, राजरतन डोंगरे, संतोष डोंगरे, रत्नदीप भिमटे यांनी सहकार्य केले.

Web Title: Constitution of the Constitution is for a strong India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.