जिल्ह्यात ठिकठिकाणी संविधान दिन साजरा
By admin | Published: November 29, 2015 02:41 AM2015-11-29T02:41:27+5:302015-11-29T02:41:27+5:30
भारतीय संविधान दिन जिल्ह्यात ठिकठिकाणी साजरा करण्यात आला. प्रत्येक ठिकाणी संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले.
गोंदिया : भारतीय संविधान दिन जिल्ह्यात ठिकठिकाणी साजरा करण्यात आला. प्रत्येक ठिकाणी संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले. अनेक ठिकाणी रॅली काढून भारतीय संविधानाचे महत्व समजाविण्यात आले.
सरस्वती शिशु मंदिर
गोंदिया : बाल विकास शिक्षण संस्थेद्वारे संचालित सरस्वती शिशु मंदिर प्राथमिक शाळा रामनगर येथे संस्थासचिव महेंद्र कठाणे यांच्या अध्यक्षतेखाली संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापिका दिप्ती तावाडे, रेखा बोरकर उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी सूर्याटोला व रामनगर येथे रॅली काढली. नवनीता मेश्राम व राजकुमार जांभूळकर यांनी संविधानासंदर्भात माहिती विद्यार्थ्याना सांगितले. यशस्वीतेसाठी तेजकुमार चौधरी, प्रेमकुमार मेश्राम, माधव नान्हे, झनक शेंडे, रोशन जैन, राजेंद्र नागपुरे, कुंदा खरकाटे, नेहा कुळकर्णी, प्रणिता लोणारकर यांनी सहकार्य केले.
दयानंद विद्या मंदिर
गोंदिया : दयानंद विद्या मंदिर प्रा. शाळा गोंदिया येथे चंद्रशेखर पंचभाई यांच्या अध्यक्षतेखाली संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी संविधानावर माहिती देण्यात आली. सोबतच २६/११ च्या मुंबई हल्यातील शहिदांना श्रध्दांजली वाहण्यात आली. संचालन कपिला चव्हाण तर आभार विशाल रणदिवे यांनी मानले. यशस्वीतेसाठी उषा फटिंग, विशाल रणदिवे, नितू केवट, शिखा अमृते, प्रिया ढगे यांनी सहकार्य केले.
धोटे बंधू विज्ञान महाविद्यालय
गोंदिया : धोटे बंधु विज्ञान महाविद्यालयात प्राचार्य अंजन नायडू यांच्या अध्यक्षतेखाली संविधान दिन साजरा करण्यात आला. अतिथी म्हणून डॉ. एच.आर. त्रिवेदी, प्रा. प्रीती नागपुरे उपस्थित होते. यावेळी संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले. संचालन व आभार प्रीती नागपुरे यांनी केले. यशस्वीतेसाठी रासेयोचे विद्यार्थी व आकाश पारधी यांनी सहकार्य केले.
कोल्हटकर क.महाविद्यालय, आसोली
गोंदिया : के.एम.कोल्हटकर कनिष्ठ महाविद्यालय आसोली येथे संविधान दिनानिमित्त विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य विजय टेंभरे, प्रा. नितेश गायधने, प्रा.बोपचे, प्रा.पटले उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी गीत व भाषणे सादर केली.
ग्रामपंचायत कार्यालय चान्ना/बाक्टी
बोंडगावदेवी : चान्ना/बाक्टी येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने संविधान दिन साजरा करण्यात आला. ग्रामपंचायत सरपंच मोरेश्वर सोनवाने यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संविधान प्रास्ताविक उद्देशिका प्रतिमाचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी उपसरपंच रायभान हुमणे, ग्रा.पं.सदस्य अरविंद शेंडे, भाष्कर लोगडे, निर्मला राखडे, पुष्पलता राखडे, वनमाला मरस्कोल्हे, कल्पना खोब्रागडे, हेमलता सोनवाने, आर.के.सोनवाने, अरून सयाम उपस्थित होते.संचालन व प्रास्ताविक ग्रामसेवक संग्रामे यांनी केले.
मानवता विद्यालय व क.महाविद्यालय
बोंडगावदेवी : मानवता विद्यालय तथा कला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने संविधान दिन साजरा करण्यात आला. गावातील प्रमुख मार्गावरून संविधान रॅली काढण्यात आली. अध्यक्षस्थानी प्राचार्य एन.एस. डोंगरवार होते. भारतीय संविधान उद्देशिकेचे वाचन गोपीकिशन भोयर यांनी केले. भारतीय संविधानातील मार्गदर्शक तत्वे, अधिकार, कर्तव्य याबद्दल मार्गदर्शन यशवंता बोरकर यांनी केले. सामान्यजनांच्या जीवनात आनंदाचे क्षण निर्माण होत असल्याचे प्राचार्य डोंगरवार यांनी सांगितले.
ग्राम पंचायत बाक्टी
बोंडगावदेवी : बाक्टी/चान्ना ग्रामपंचायतच्या वतीने शासकीय आदेशान्वये संविधान दिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी संविधान प्रास्ताविकतेचे सामूहिक वाचन करण्यात आले. अध्यक्षस्थानी सरपंच जितेंद्र शेंडे, अतिथी म्हणून उपसरपंच प्रेमलाल भोयर, हरिश्चंद्र शहारे, हिवराज सांगोडे, कमला लाडे, मंदा बनकर, दिपलता सांगोडे, नवनीता बडोले, कमला चाचेरे, मनोहर रोकडे, तंमुस अध्यक्ष मोतीराम शेंडे, गंगाधर मेश्राम, ग्रामसेवक टी.आर.वाघमारे, देवेंद्र द्रुगकर, सचिन चवरे उपस्थित होते. सरपंच जितेंद्र शेंडे यांनी बाबासाहेब आंबेडकराचे उज्वल भारतासाठी केलेल्या भरीव योगदानाची माहिती दिली.
समर्थ हायस्कूल चिखली
चिखली : समर्थ एज्युकेशन सोसायटी दांडेगावतर्फे संचालित श्री समर्थ हायस्कूल चिखली येथे मुख्याध्यापक एस.एच.ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली संविधान दिन साजरा करण्यात आला. स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्यायावर आधारीत संविधानाची निर्मिती असल्याचे ठोंबरे यांनी सांगितले. यावेळी संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले. छाया हरिणखेडे व तेजस्वीनी ठाकरे या विद्यार्थीनी गीत सादर केले. प्रिया हरिणखेडे, वी.जी.मोटघरे, एस.एस.बिसेन, के.पी.बघेले यांनी आपले विचार मांडले. संचालन आर.जी.धुर्वे तर आभार आय.टी.वैद्य यांनी मानले. यशस्वीतेसाठी ए.आर.बिसने, एम.बी.मेश्राम, डहाके, आर.डी.तिडके यांनी सहकार्य केले.
आझाद उर्दू प्राथमिक शाळा
गोंदिया : आझाद उर्दू प्राथमिक शाळा गोंदिया येथे मुख्याध्यापक टी.एल.शेख यांच्या अध्यक्षतेखाली संविधान दिन साजरा करण्यात आला. संविधानाचे उद्देश व प्रारूप व रचना यावर मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांची रॅली काढून संविधान दिन साजरा करण्यात आला.
पोलीस ठाणे तिरोडा
तिरोडा : तिरोडा येथील पोलीस ठाण्यात पोलीस मित्र संकल्पना व संविधान दिवस उपविभागीय पोलीस अधिकारी डी.बी.इलमकर यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला. यावेळी पोलीस निरीक्षक संजय देशमुख, सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे, शामराव झरारिया, मोहन ग्यानचंदानी, सुनिल बारापात्रे, सलामभाई, माधुरी रहांगडाले उपस्थित होते. याप्रसंगी २६/११ मुंबईच्या हल्यातील शहिदांना श्रध्दांजली वाहण्यात आली. यशस्वीतेसाठी पोलीस उपनिरीक्षक निलेश वाहणे, सुनिल शेंडे, खुशाल चौधरी, छत्रपाल चंदेल, चित्तरंजन कोडापे, निशा बोंदरे यांनी सहकार्य केले. संचालन व आभार पोलीस नायक शिपाई लितेश गोस्वामी यांनी केले.
मनोहरभाई पटेल इन्स्टिट्युट आॅफ फार्मसी
गोंदिया : एम.आय.बी.पी. गोंदिया येथील प्राचार्य नितीन इंदूरवाडे यांच्या अध्यक्षतेखाली संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले. याप्रसंगी डॉ. वंजारी, डॉ. काटोलकर, प्रा. चौधरी, प्रा. सचिन मोरे, प्रा. तुळसकर, प्रा. शेख, प्रा. निंबेकर, प्रा. मिश्रा, मस्करे, पुरोहित व प्रा. पूनम भांगे उपस्थित होते.
जे.एम. हायस्कूल सिव्हील लाईन
गोंदिया : सिव्हील लाईन येथील जे.एम. हायस्कूल येथे मुख्याध्यापक सी.डी. मेंढे यांच्या अध्यक्षतेखाली संविधान दिन साजरा करण्यात आला. अतिथी म्हणून शिक्षक एस.एन. अग्रवाल, पी.एच. मेश्राम, आर.एन. राखडे, बी.एम. कापगते, एन.सी. नागपुरे उपस्थित होते. यावेळी संविधानाच्या उद्देशिकांचे वाचन करण्यात आले. संचालन पी.एस.गौतम तर आभार एन.सी. नागपुरे यांनी मानले.
नागार्जुन बुध्द विहार
गोंदिया : नागार्जुन बुध्द विहार व श्रीमती चंद्रभागाबाई चंचलबेन पटेल प्राथमिक शाळा गांधी वार्ड गोंदिया येथे संविधान दिन संस्था सचिव सुर्तीसेन वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला. यावेळी उपासिका निलू महंती, शिक्षीका रामटेके, अंजू वैद्य उपस्थित होते. यावेळी मुख्याध्यापक पी.एफ.रहांगडाले यांनी भारताच्या संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन केले. आभार लिल्हारे यांनी मानले. यशस्वीतेसाठी छाया शहारे, प्रमिला भालाधरे, चंद्रकला डोंगरे, लक्ष्मी गणविर, अश्विनी वैद्य उपस्थित होते.
नेहरू युवा केंद्र
गोंदिया : नेहरू युवा केंद्रातर्फे गणखैरा येथील हम हायस्कूल येथे संविधान दिन पुष्पराज जनबंधू यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला. पाहुणे म्हणून बी.के.लिल्हारे, अखिलेश मिश्रा, व्ही.आर.गजबे, सरपंच रमेश ठाकूर, के.एन. मेंढे, जे.एस. कटरे, वाय.के. बिसेन, एम.एस. पवार, विलास मेश्राम उपस्थित होते. संचालन एस.आर .गारूडे आभार डी.एस. बघेले यांनी मानले. यशस्वीतेसाठी एस.बी. टेंभरे, एम.एस. मौजे, प्रमोद शहारे, एम.एस. जनबंधू यांनी सहकार्य केले.
जि.प.हिंदी प्राथमिक शाळा कहाली
सोनपुरी : मुख्याध्यापक एस.पी.गिरी यांच्या अध्यक्षतेखाली जि.प. हिंदी वरिष्ठ प्राथमिक शाळा कहाली येथे संविधान दिन साजरा करण्यात आला. पाहुणे म्हणून माजी सरपंच झनकलाल उपराडे, शिक्षक राजकुमार बसोने, आर.के. लिल्हारे, ओ.एच. लिल्हारे, एस.एम. दशरिया, के.डी. नवगौडे उपस्थित होते. यावेळी प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले. संचालन आर.के. लिल्हारे तर आभार राजकुमार बसोने यांनी मानले. यशस्वीतेसाठी सुरेश मच्छिरके, पुष्पा काळसर्पे यांनी सहकार्य केले.
नमाद महाविद्यालय
गोंदिया : गोंदिया शिक्षण संस्था द्वारे संचालित नटवरलाल माणिकलाल दलाल महाविद्यालयात संविधान दिनानिमित्त संविधान प्रास्ताविकेचे वाचन करून शहरात राष्ट्रीय सेवा योजनाच्या स्वयंसेवकानी प्राचार्य योगेश नासरे यांच्या मार्गदर्शनाखाली रासेयो विभागीय समन्वयक प्रा.बबन मेश्राम यांच्या नेतृत्वात संविधान समता रॅली काढली.
अध्यक्षस्थानी भवभूती महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रविणकुमार लोणारे, सामाजिक कार्यकर्ते ओमप्रकाश सपाटे, डॉ.एस.यु.खान, प्रा.संतोष चोपकर उपस्थित होते. यावेळी प्रा. प्रविणकुमार लोणारे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पूजन करून संविधान पुस्तिकाचे अवलोकन व विद्यार्थ्यांकडून संविधान प्रास्ताविकांचे वाचन करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयातून संविधान समता रॅली काढण्यात आली. प्रास्ताविक भाषण प्रा.बबन मेश्राम यांनी केले. संचालन राखी पटले हिने तर आभार रमेश बहिटवार यांनी मानले. यशस्वीतेसाठी किजल पटेल, श्याम नागज्योती, सरिता सोनवाने, विशाल शेंडे, अमन सोनी, उमराव येल्ले, शालिक येल्ले, दिनेश सव्वालाखे, दिनेश दमाहे, वैष्णव, योगेश खोब्रागडे, वैभव शहारे, शुभम शिंगाडे, संस्कृती मेश्राम, संकेत बघेले, अक्षय चव्हाण, सारिका रहांगडाले, शुभम पोरच्चरीवार सह रासेयोच्या स्वयंसेवकांनी सहकार्य केले.
लघुसिंचन (जलसंधारण) विभाग
गोंदिया : कार्यकारी अभियंता लघु सिंचन (जलसंधारण) विभाग, गोंदिया येथे संविधान दिन कार्यकारी अभियंता विलास निखारे यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला. अतिथी म्हणून उपकार्यकारी अभियंता बी.बी. रहांगडाले उपस्थित होते. दुलीचंद बुध्दे यांनी संविधान उद्देशिका वाचन केले. प्रास्ताविक अजय उखरे यांनी केले. याप्रसंगी सर्व अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते.
जेतवन बुध्द विहार
गोंदिया : श्रीनगर गोंदिया येथे संविधान दिवस साजरा करण्यात आला. संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. यावेळी डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमेला माल्यार्पण केले. कार्यक्रमाला श्रीनगरातील नागरिक उपस्थित होते. उद्देशिकेचे वाचन ललिता बोम्बार्डे यांनी समस्त नागरिकांना सामूहिक वाचन करविण्यात आले. यशस्वीतेसाठी मंदाकिनी मेश्राम, दमयंता मेश्राम, रायवंता भिमटे, शकुतला हुमणे, प्रमिला डोंगरे, कमला खापर्डे, वनिता बडगे, जना शहारे, प्रमिला शेंडे, कुशलता धारगावे, मनोरमा रोकडे, विद्या बोम्बार्डे उपस्थित होते.
जि.प.शाळा सोनपुरी
सोनपुरी : जि.प.प्राथ. शाळा सोनपुरी येथे संविधान दिन साजरा करण्यात आला. शासनाच्या परिपत्रकातील सुचनेनुसार संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामुहिक वाचन करण्यात आले. अध्यक्षस्थानी सरपंच राखी ठाकरे, प्रमुख पाहुणे म्हणून, के.यु.ठाकूर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गजानन चौरागडे, दिलीप मेश्राम, लेखराम ठाकरे, मनोज पटले, आंगणवाडी सेविका ठाकरे, उरकुडे, सचिव एस.गौतम व गावातील मंडळी उपस्थित होते. यावेळी २६/११ च्या मुंबई येथील झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहिदांना श्रध्दांजली वाहण्यात आली. संचालन शिक्षक रहांगडाले यांनी तर आभार सचिव एस. गौतम यांनी मानले.
जि.प. हायस्कूल व क.महाविद्यालय
सुकडी-डाकराम : जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालया सुकडी-डाकराम विद्यालयाच्या प्रांगणात संविधान दिन साजरा करण्यात आला. विद्यालयाच्या प्रांगणात १२५ विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधीक स्वरूपात संविधानाचे वाचन करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्राचार्य ए.झेड. नंदेश्वर, अतिथी म्हणून बी.एन. सोनटक्के, ए.व्ही. मेश्राम, यु.टी. पारधी, के.के. मेश्राम, एस.ए. कापगते, सीता छाये, पी.एस. डांगे उपस्थित होते. रॅलीचे संचालन बी.एन. सोनटक्के, ए.व्ही. मेश्राम यांनी केले. आभार के.एन. लिचडे यांनी मानले. सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहकार्य केले.
हिंदी वरिष्ठ प्राथ. शाळा रामाटोला
सोनपुरी : सालेकसा पंचायत समिती अंतर्गत जि.प. हिंदी वरिष्ठ प्राथमिक शाळा कहाली केंद्र रामाटोला येथे संविधान दिन उच्चश्रेणी मुख्याध्यापक एस.पी.गिरी यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला. यावेळी पाहुणे म्हणून माजी सरपंच झनकलाल उपराडे, पदविधर शिक्षक राजकुमार बसोने, आर.के.लिल्हारे, ओ.एच. लिल्हारे, एस. एम. दसरिया, के.डी.नवगौडे उपस्थित होते. कार्यक्रमात संविधानविषयी माहिती देऊन प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले. संचालन आर.के.लिल्हारे यांनी तर आभार राजकुमार बसोने यांनी मानले.
जि.प.हिंदी प्राथमिक शाळा निंबा
सोनपुरी : जि.प.हिंदी वरिष्ठ प्राथमिक शाळा निंबा येथे संविधान दिन मुख्याध्यापक रामरतन रेला यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला. यावेळी सुरेश मच्छिरके, पुष्पा काळसर्पे उपस्थित होते. संचालन व आभार आर.एस.राऊत यांनी केले.
जि.प.प्राथमिक शाळा चिखली
चिखली : ग्रा.पं. चिखली व जि.प.प्राथमिक शाळा चिखली संयुक्तपणे संविधान दिवस साजरा करण्यात आला. यावेळी भारतीय संविधानाच्या प्रतिचे पूजन करून गावात रॅली काढण्यात आली. यावेळी पं.स. सदस्य गिरीधारी हत्तीमारे, माजी जि.प. सदस्य जागेश्वर धनभाते, सरपंच सुधाकर कुर्वे, उपसरपंच विश्वनाथ थेर, देवानंद गभणे, सचिव आर.डी.देशमुख, खेमराज राऊत, मंदा राऊत, मुख्याध्यापक ए.आर.राऊत, शिक्षक जी.जी. गजापुरे, बी.जे. येरणे, यु.एम. लोथे, आर.डी. भुसारी उपस्थित होते.
लक्ष्मीबाई गणवीर वाचनालय, सिलेझरी
सिलेझरी : लक्ष्मीबाई नामदेव गणवीर वाचनालय, सिलेझरीच्या वतीने संविधान दिन अध्यक्ष पुरूषोत्तम नंदेश्वर यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला. प्रमुख अतिथी म्हणून माजी जि.प. अध्यक्ष चंद्रशेखर ठवरे, प्रमुख मार्गदर्शक प्रा.जे.एस. भोवते, पी.आर. खोब्रागडे, सरपंच प्रकाश टेंभूर्णे, उपसरपंच विवेक खंडाईत, तंमुस अध्यक्ष भोजराम ब्राह्मणकर, धार्मिक गणविर, बिरसा मुंडा स्मारक समिती अध्यक्ष आसाराम उईके, सुखदेव मेंढे, ग्रा.पं. सदस्य सुनीता ब्राह्मणकर, पोलीस पाटील पिसाराम नंदेश्वर, बजरंग दल, समता सैनिक दल, भीमशक्तीचे पदाधिकारी उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा.चंद्रशेखर गणवीर, संचालन प्रा.पिसराम गणवीर तर आभार उमराव शहारे यांनी मानले. यशस्वीतेसाठी अतूल नंदेश्वर, महेश टेंभुर्णे, सोनाली टेंभुर्णे, अंकिता वालदे, जयश्री पंचभाई, लहानू गणवीर, आकांक्षा मेश्राम, प्रणय मेश्राम, बुध्दशील यांनी सहकार्य केले.
पं. स. अर्जुनी-मोरगाव
अर्जुनी-मोरगाव : पंचायत समिती अर्जुनी-मोरगाव येथील सभागृहात आयोजित संविधान दिन समारंभाच्या अध्यक्षस्थानी पं.स. सभापती अरविंद शिवणकर, अतिथी म्हणून खंडविकास अधिकारी नारायण जमईवार, सहायक खंडविकास अधिकारी डॉ. चेतन जाधव, पं.स. सदस्य रामलाल मुंगनकर, पं. सदस्या करूणा नांदगावे उपस्थित होते. सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संविधान उद्देशिकेच्या प्रतिमेसमोर दिप प्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले. संचालन कृषी अधिकारी उईके यांनी केले.
जि.प.व प्राथमिक शाळा बाक्टी
बोंडगावदेवी : जिल्हा परिषद व प्राथमिक शाळा बाक्टी येथे संविधान दिन मुख्याध्यापिका मीना लिचडे यांच्या अध्यक्षतेखाले साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांसाठी भारतीय संविधान या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली. संविधान प्रास्ताविक उद्देशिकेचे विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी सामूहिक वाचन करण्यात आले. ओमप्रकाश वासनिक यांनी संविधान दिन यावर विशेष कविता सादर केली. संचालन कैलास हाडगे तर आभार छाया मदने यांनी मानले.
जि.प.प्रा.शाळा बुटाई क्रमांक २
बोंडगावदेवी : जि.प. प्राथमिक शाळा बुटाई क्रमांक २ याठिकाणी संविधान दिन साजरा करण्यात आला. संविधान दिन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रप्रमुख मंजूषा वैष्णव, अतिथी म्हणून देवीदास मोहुर्ले, सेवानिवृत्त उपकोषागार वालदे, आंगणवाडी सेविका उपस्थित होेते. विद्यार्थ्यांसह गावातून रॅली काढून संविधान दिनाच्या घोषवाक्याने ग्रामस्थांना जागृत करण्यात आले. भीमगीत गायन स्पर्धा घेण्यात आली. संचालन अंजिता मेंढे यांनी तर आभार गिरीधर नाकाडे यांनी मानले.
श्रीविद्या गर्ल्स हायस्कूल साखरीटोला
साखरीटोला : स्थानिक श्री विद्या गर्ल्स हायस्कूल येथे मुख्याध्यापिका अजया कठाणे यांच्या अध्यक्षतेखाली संविधान दिनसाजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून के.पी. रहांगडाले, एम.के. कोरे, पी.सी. बोपचे, एम.बी.पटले, पी.बी. झा, एन.एच. थदानी, एन. एस. काशीवार, टी.जी. फुंडे, डी.एस.बहेकार, एस.एस. बडोले, आर.एस.थोटे, एम. के. रहांगडाले उपस्थित होते. यावेळी संविधान पुस्तकाचे वाचन करून कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आला. गावातून रॅली काढून संविधान दिन चिरायू होवो अशा घोषणा देण्यात आल्या. इयत्ता ५ वी ते १० वीच्या विद्यार्थिनीनी यात भाग घेतला. संविधानातून सर्वांना हक्क व अधिकार देण्यात आल्याचे मुख्याध्यापिका कठाणे यांनी सांगितले. यशस्वीतेसाठी ए.डी. आईन्द्रेवार, एच. सी. वाघमारे, डी.ए. चिंधालोरे, ए.एन. वर्गन्टवार यांनी सहकार्य केले.
दुबे न.प. प्राथमिक शाळा, तिरोडा
तिरोडा : स्थानिक डॉ. छत्रपती दुबे न.पं. प्राथमिक शाळेत संविधान दिन विशाल वेरूळकर यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक डी.डी. गिरीपुंजे, सोनाली जोहरी, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा मंदा बागडे, फिरोजा पठान, भारती नागरीकर उपस्थित साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थी व शिक्षकांकडून संविधान प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. सोशल मीडिया यावर विशाल वेरूळकर यांनी मार्गदर्शन केले. सामाजिक न्याय, बंधुता, स्वातंत्र्य, समता, सहिष्णुता यावर मुख्याध्यापक डी.डी. गिरीपुंजे यांनी मार्गदर्शन केले. संचालन डी.डी. गिरीपुंजे आभार एम.आर. काशिवार यांनी मानले. यशस्वीतेसाठी ललिता नेवारे, कंचन भुरे, मुक्ता समरीत, मंदा हजारे, रजनी सव्वालाखे, मुन्नी डोळस, सुशिला ढबाले, रेखा रहांगडाले यांनी सहकार्य केले.
जि.प.वरिष्ठ प्राथ. शाळा कडोतीटोला
साखरीटोला : जि.प.वरिष्ठ प्राथमिक शाळा कडोतीटोला येथे संविधान दिन साजरा करण्यात आला. सकाळी विद्यार्थ्यांची गावातून रॅली काढण्यात आली. गावातील चौकात भारतीय संविधानाचे वाचन करण्यात आले. दुपारी १२ वाजता पालक सभा घेण्यात आली. मुख्याध्यापक जी.यु. जायभाये यांनी संविधान दिनाबद्दल माहिती दिली. एस.बी. प्रदीते यांनी संविधान दिनाचे महत्व काय यावर माहिती दिली. शालेय विद्यार्थ्यांनी भाषणे व गीत सादर केले. संचालन जी.यु. जायभाये यांनी तर आभार बी.टी. रहांगडाले यांनी मानले.
पशिने विद्यालय
गोंदिया : दासगाव येथील श्रीमती अनसूयाबाई पशिने विद्यालय तथा अर्चना पशिने कनिष्ठ महाविद्यालयाकडून रॅली काढून जनजागृती करण्यात आली. प्राचार्य कु.बिसेन, प्रा.चव्हान, प्रा.नंदागवळी व इतर शिक्षकांनी विद्यार्थ्यांना संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करून त्याचे पालन करण्याची शपथ दिली.