राज्यघटनेमुळे लोकशाही व्यवस्था मजबूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2017 12:21 AM2017-01-28T00:21:05+5:302017-01-28T00:21:05+5:30

आधुनिक भारताला सर्वात मोठी मिळालेली देणगी म्हणजे भारतीय राज्यघटना होय. या राज्यघटनेमुळेच

The constitution has strengthened democracy | राज्यघटनेमुळे लोकशाही व्यवस्था मजबूत

राज्यघटनेमुळे लोकशाही व्यवस्था मजबूत

googlenewsNext

पालकमंत्री बडोले : पोलीस कवायत मैदानावर प्रजासत्ताकदिनाचा दिमाखदार सोहळा
गोंदिया : आधुनिक भारताला सर्वात मोठी मिळालेली देणगी म्हणजे भारतीय राज्यघटना होय. या राज्यघटनेमुळेच देशाला एक मजबूत लोकशाही व्यवस्था मिळाली, असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
कारंजा येथील पोलीस कवायत मैदानावर भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ६७ व्या वर्धापन दिनाच्या मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभात ते बोलत होते. राष्ट्रध्वजारोहणानंतर पालकमंत्र्यांनी परेडचे निरिक्षण केले. यावेळी जि.प.अध्यक्ष उषाताई मेंढे, उपाध्यक्ष रचना गहाणे, जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भुजबळ, नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखिव क्षेत्राचे वनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक डॉ.रविकिरण गोवेकर, उपवनसंरक्षक डॉ.जितेंद्र रामगावकर, नगराध्यक्ष कशिश जायसवाल यांची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री बडोले म्हणाले, जगातील श्रेष्ठ राज्यघटनांमध्ये आपल्या देशाच्या राज्यघटनेचा समावेश आहे. राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्वानुसार देशाची बांधिलकी स्वातंत्र्य, समता, बंधुभाव आणि सर्वांसाठी समान न्याय या तत्वांवर आधारीत आहे. देशातील सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी आणि आर्थिक, सामाजिक उन्नतीसाठी योजना राबविण्याची जबाबदारी राज्य संस्थेची आहे. आपला भौतिक तथा राजकीय-सांस्कृतिक विकास साधत अत्यंत सन्मानाने जीवन जगण्यासाठी भारतीय राज्यघटनेने कोणत्याही प्रकारच्या जात, धर्म, लिंग, रंग भेदाशिवाय प्रत्येक नागरिकाला अनेक मुलभूत अधिकार दिले आहेत. समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी भारतीय महिलांना पुरु षांच्या बरोबरीने समान न्याय व हक्क मिळाला पाहिजे यासाठी राज्यघटनेत विविध तरतूदी करण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्र माला अपर जिल्हाधिकारी मंगेश मोहिते, निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण मिहरे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.संदीप पखाले, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.अजय केवलीया, उपजिल्हाधिकारी विलास ठाकरे, जिल्हा कोषागार अधिकारी दिगंबर नेमाडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश बागडे, राजकुमार पुराम, राजेश देशमुख, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.देवेंद्र पातुरकर, उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता हेमंत गाणार, सोनाली चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शाम निमगडे, शिक्षणाधिकारी उल्हास नरड, राज्य उत्पादन शल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मीक, जिल्हा जात पडताळणी समितीचे सदस्य सचिव देवसुदन धारगावे, समाजकल्याणचे सहायक आयुक्त मंगेश वानखेडे, वन्यजीव विभागाचे विभागीय वन अधिकारी कातोरे, सहायक वनसंरक्षक बिसेन, शेंडे, आदींसह लोकप्रतिनिधी, ज्येष्ठ नागरिक, पत्रकार, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पोलीस परेडचे संचलन परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक राजू नवले यांनी केले. परेडमध्ये पोलीस दल, गृहरक्षक दल, बीट मार्शल पथक, निर्भया पथक, नवेगाव-नागझरिा व्याघ्र जलद बचाव दल, होमगार्ड, एन.सी.सी., भारत स्काऊट-गाईड पथक, बुलबुल पथक, रस्ता सुरक्षा पथक, पोलीस बँड पथक, फिरते न्यायवैदयक पथक, श्वान पथक, बॉम्ब शोधक पथक, शीघ्र कृती दल, दंगल नियंत्रण पथक, गोंदिया नगरपरिषद अग्नीशमन यांनी सहभाग घेतला.
जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने कॅशलेस व्यवहाराबाबत जनजागृती तसेच सर्वसाधारण योजनांची सचित्र माहिती दर्शविणारा चित्ररथ, वन्यजीव विभाग, शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, सामाजिक वनीकरण विभाग, रस्ता सुरक्षा रथ, सेंद्रीय तांदूळ वापराबाबत जागृती आदी चित्ररथ यामध्ये सहभागी होते. यानंतर विविध शाळेच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. कार्यक्रमाचे संचालन मंजुश्री देशपांडे यांनी केले. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: The constitution has strengthened democracy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.