संविधान बचाव मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2018 12:04 AM2018-09-02T00:04:52+5:302018-09-02T00:06:06+5:30
नवी दिल्ली येथील जंतर-मंतर वर ९ आॅगस्ट रोजी जातीयवादी संघटनेच्या काही विकृत मानसिकतेच्या कार्यकर्त्यानी देशाचे संविधान पोलिसांसमोर जाळून संविधान विरोधी घोषणा दिल्या. या कृतीचा निषेध करण्यासाठी शनिवारी (दि.१) संविधान बचाव मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अर्जुनी-मोरगाव : नवी दिल्ली येथील जंतर-मंतर वर ९ आॅगस्ट रोजी जातीयवादी संघटनेच्या काही विकृत मानसिकतेच्या कार्यकर्त्यानी देशाचे संविधान पोलिसांसमोर जाळून संविधान विरोधी घोषणा दिल्या. या कृतीचा निषेध करण्यासाठी शनिवारी (दि.१) संविधान बचाव मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. त्या समाटकंटकावर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन शिष्टमंडळाच्यावतीने नायब तहसीलदारांना देण्यात आले. या मोर्च्यात १६ संघटना सहभागी झाल्या होत्या.
संविधान बचाव रॅलीची सुरुवात दुपारी १२ वाजता दुर्गा चौक येथून झाली. त्यानंतर रॅलीचे रुपातंर विराट मोर्चात झाले. मोर्चा गावातील मुख्य बाजारपेठेतून तहसील कार्यालयाच्या प्रांगणात येऊन धडकला. विविध स्तरावर सामाजिक कार्य करणाऱ्या वक्त्यांनी संबोधीत केले. यावेळी अध्यक्षस्थानी सोनदास गणवीर हे होते. मोर्चेकºयांना संबोधीत करणाºयात उध्दव मेहंदळे, लोकपाल गहाणे, विजय लाडे, रत्नदीप दहिवले, लक्ष्मीकांत मडावी, सुनिता हुमे, सुनिता कोकोडे, अजय अंबादे, यशवंत सोनटक्के, होमराज ठाकरे, मनोहर ठाकरे, बामसेफचे नांदगावे, अनिल बावणे यांचा समावेश आहे. विकृत मानसिकतेच्या कार्यकर्त्यांच्या कृतीचा निषेध व्यक्त करुन त्या समाजकंटकावर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन नायब तहसीलदार एम.एम.गेडाम यांना देण्यात आले. मोर्च्याची सुरुवात होते वेळी पावसाने हजेरी लावली.भर पावसात मोर्चेकरी मार्गक्रमण करीत होते. कार्यक्रमाचे संचालन यशवंत गणवीर यांनी केले.