मनोहर चौकात आंबेडकर प्रवेशद्वाराचे बांधकाम करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2017 09:29 PM2017-11-26T21:29:49+5:302017-11-26T21:31:06+5:30
शहरातील प्रमुख व प्रसिद्ध मार्ग असलेल्या मनोहर चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे बांधकाम करण्यात यावे,...
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शहरातील प्रमुख व प्रसिद्ध मार्ग असलेल्या मनोहर चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे बांधकाम करण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन नगराध्यक्ष अशोक इंगळे व मुख्याधिकारी चंदन पाटील यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्यावतीने देण्यात आले.
पूर्वीच्या नगर परिषद पदाधिकाºयांनी १४ जुलै २०१४ रोजी आमसभा घेवून प्रस्ताव क्रमांक २१ मध्ये सदर प्रवेशद्वार मंजूर केले होते. त्याकडे या वेळी आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ कार्यकर्ते, कर्मचारी संघटन, बौद्ध सामूहिक विवाह समिती, सामान्य कार्यकर्ते, स्मारक समितीचे अध्यक्ष पी.एस. फुले, सामाजिक कार्यकर्ते अरूण गजभिये, सुरेंद्र खोब्रागडे, अॅडव्होकेट्स महिला मंडळ आदींनी नगराध्यक्ष व मुख्याधिकाºयांचे लक्ष वेधले.
या वेळी नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांनी निवेदन स्वीकार केले व चर्चा केली. यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक अस्थिकलश परिसराचे सौंदर्यीकरण केल्यास शहराचे नाव उंचावेल. जवळ पांगोली नदीचे पात्र असून अनेक मोठ्या शाळा स्थापित झाल्या आहेत. अॅड.ए.बी. बोरकर यांनी स्थळाचे महत्व व शहराच्या सौंदर्यीकरणाबाबत पटवून दिले. शहरातील एकमेव मनोरम व पवित्र स्थळ जनतेसाठी, विद्यार्थ्यांसाठी, बौद्ध सामूहिक विवाहासाठी व इतर कार्यक्रमांसाठी उपयुक्त असल्याचे सांगण्यात आले.
यावर चर्चेअंती मुख्याधिकारी चंदन पाटील यांनी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार, शहराची शान व आंबेडकरी जनतेची मागणी लक्षात घेता प्रस्ताव मंजूर करून बांधकामाची अंमलबजावणी करणे भाग आहे. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक अस्थिकलश परिसराचे सौंदर्यीकरण करण्यासाठी नगर परिषद पुरेसा फंड उपलब्ध करेल, असे आश्वासन दिले.
याप्रसंगी सभापती भावना कदम, पंकज यादव यांनी पुरजोर सहमती दर्शविली. या वेळी रमेश ठवरे, जी.पी. ढवळे, अॅड. रंगारी, अॅड. भौतिक, अॅड.ए.बी. बोरकर, अॅड. सचिन बोरकर, अॅड. वंजारी, अॅड. शैलेंद्र गडपायले, समिती अध्यक्ष पी.एस. फुले, अरूण गजभिये, सुरेंद्र वासनिक, शोभा बन्सोड, विकास शेंडे, विजय उके, एन.टी. बोरकर, सावजी मेश्राम, पांडुरंग गजभिये, हुसेन मेश्राम, भुपेंद्र वैद्य, उमराव वानखेडे, सूर्यवंशी कमलेश वासनिक, सुरेंद्र बोरकर, मंगेश बावणकर, प्रभुदास नागदेवे, अनिकेश भिमटे, अनुनाथ भिमटे, कुंवर वैद्य, भिमराव राऊत, धर्मेंद्र रंगारी, दुलीचंद मेश्राम, राजेंद्र बन्सोड, बेला नंदागवळी, मनू उके, शीला मेश्राम, नादीराम महंती आदी उपस्थित होते.