शेतकऱ्याची परवानगी न घेताच बंधाऱ्याचे बांधकाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 08:45 PM2018-05-30T20:45:12+5:302018-05-30T20:45:53+5:30

दुष्काळी परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी राज्य शासनाने जलयुक्त शिवार अभियान सुरू केले आहे. मात्र या योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याने योजनेच्या उद्देशाला डावलले जात आहे.

Construction of the bamboo without the permission of the farmer | शेतकऱ्याची परवानगी न घेताच बंधाऱ्याचे बांधकाम

शेतकऱ्याची परवानगी न घेताच बंधाऱ्याचे बांधकाम

Next
ठळक मुद्देअधिकाऱ्यांचे दुर्लक्ष : बांधकामातील साहित्य निकृष्ट दर्जाचे

लोकमत न्यूज नेटवर्क
परसवाडा : दुष्काळी परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी राज्य शासनाने जलयुक्त शिवार अभियान सुरू केले आहे. मात्र या योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याने योजनेच्या उद्देशाला डावलले जात आहे. तर बंधाऱ्याचे बांधकाम करताना त्यात जमीन जाणाऱ्या शेतकऱ्यांची परवानगी देखील घेतली जात नसल्याचा प्रकार तिरोडा तालुक्यातील परसवाडा येथे उघडकीस आला आहे.
परसवाडा येथे छगन मरस्कोल्हे यांच्या शेताजवळ नाला असून या नाल्यावर गोंदिया लघू सिंचन विभागातर्फे बंधाºयाचे बांधकाम सुरू आहे. या बंधारा बांधकाम मरस्कोल्हे यांची तीन आर जागा गेली. मात्र याची माहिती मरस्कोल्हे यांना नव्हती. त्यांना ही माहिती कळल्यानंतर त्यांना याचा धक्का बसला व २६ मे रोजी या शेतकºयाचा मृत्यू झाला. त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. विशेष म्हणजे या बंधारा बांधकामात वापरल्या जाणाºया साहित्यावर सुध्दा शंका निर्माण झाली आहे. बंधाºयाचे बांधकाम करताना माती खोदून झाल्यानंतर ८ एमएम दगडांची पीचिंग केली जाते. नंतर ४० एमएम गिट्टीची १ फूट लेयर देऊन लोखंडी जाळी १० एमएम लोखंड बांधून २० एमएम गिट्टीचे सिमेंट क्रांकीट टाकून लेयर टाकले जाते.
भिंत तयार करताना जाळी तयार करुन रिंगाची जाळी तयार १० एमएम लोखंडाने करणे बंधनकारक असल्याचे अंदाजपत्रकात नमूद आहे. मात्र कंत्राटदार अंदाज पत्रकातील निकषांप्रमाणे बांधकाम करीत नसल्याचा आरोप आहे. बांधकामात वापरले जाणारे दगड, लोखंड तसेच इतर साहित्य निकृष्ट दर्जाचे असून त्याच्या गुणवत्तेवर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. त्यामुळे सदर साहित्याची गुण नियंत्रण विभागाच्या अधिकाºयांकडून तपासणी करण्याची शेतकºयांची मागणी आहे.
नाल्याच्या ठिकाणी बंधाऱ्याची भिंत
ज्या ठिकाणी बंधाऱ्याचे बांधकाम सुरू आहे. त्यालगतच भिंत तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे पाणी कुठून जाणार, पावसाळ्याच्या दिवसात हेच पाणी शेतकºयांच्या शेतामध्ये जाऊन नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या बंधाऱ्याचे बांधकाम पेटी कंत्राट पद्धतीने सुरू असल्याची माहिती आहे. या बंधाºयाच्या बांधकामात निकृष्ट दर्जाच्या साहित्याचा वापर केला जात असल्याची बाब संबंधित विभागाच्या अधिकारी व कर्मचाºयांच्या निदर्शनास येवून देखील ते याकडे दुर्लक्ष करीत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
उपसरपंचांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष
येथील बंधारा बांधकाम वापरल्या जात असलेल्या साहित्याबाबत उपसरपंच राकेश वैद्य यांनी संबंधित विभागाकडे लेखी तक्रार केली. मात्र यानंतरही साधी चौकशी करण्यात आली नाही. त्यामुळे हेतूपुरस्पर अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप आहे. तिरोडा तालुक्यात जलयुक्त शिवार अभियानातंर्गत मोठ्या प्रमाणात कामे सुरू आहे. तर खैरलांजी, परसवाडा, अर्जुनी या गावातील कामे जि.प.लघुसिंचन उपविभाग तिरोडा अंतर्गत सुरू आहे. यासर्व कामांची चौकशी करण्याची मागणी उपसरपंच राकेश वैद्य, मोहन तितिरमारे, प्रतिभा टेंभुर्णीकर, उषा बोपचे यांनी केली आहे.
बांधकामावर बालमजूर
परसवाडा येथे सुरू असलेल्या बंधारा बांधकामावर बाल मजुरांचा वापर केला जात आहे. नियमानुसार बाल कामगारांना कामावर ठेवता येत नसून याची सुध्दा तक्रार गावकºयांनी संबंधित विभागाकडे केली. मात्र त्यांनी याकडे सुध्दा दुर्लक्ष केले आहे.

Web Title: Construction of the bamboo without the permission of the farmer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.