स्वराज प्रभागसंघाच्या वतीने पोषण परसबागेची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:19 AM2021-07-08T04:19:46+5:302021-07-08T04:19:46+5:30

माझी पोषण परसबाग विकास मोहीम व माझी उपजीविका समृद्धी मोहीम महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोनती अभियानांतर्गत ग्रामसंघाच्या संसाधन व्यक्तीच्या माध्यमातून ...

Construction of Nutrition Kitchen Garden on behalf of Swaraj Ward Sangh | स्वराज प्रभागसंघाच्या वतीने पोषण परसबागेची निर्मिती

स्वराज प्रभागसंघाच्या वतीने पोषण परसबागेची निर्मिती

googlenewsNext

माझी पोषण परसबाग विकास मोहीम व माझी उपजीविका समृद्धी मोहीम महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोनती अभियानांतर्गत ग्रामसंघाच्या संसाधन व्यक्तीच्या माध्यमातून सर्वत्र राबविण्यात येत आहे. परसबाग करताना तालुका व्यवस्थापक रेशीम नेवारे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका समन्वयक संतोष शहारे, प्रभागसंघ व्यवस्थापक अर्चना रामटेके, गोपाल मेश्राम, स्वराज प्रभाग संघाच्या अध्यक्ष चेतना नाकाडे, शालू बनपूरकर, धम्मक्रांती तुरकर, तसेच ग्रामसंघात महिलांची उपस्थिती होती. उमेद अभियानांतर्गत अनेक महिला ग्रामसंघाशी जुळलेल्या आहेत. महिला आत्मनिर्भर बनावे. स्वयंरोजगाराची कास धरून, आपल्या कुटुंबासह गावाच्या विकासात महिलांचा हातभार लागावा, यासाठी उमेदच्या वतीने नावीन्यपूर्ण अभियान राबविण्यात येत असल्याचे प्रभाग संघ व्यवस्थापक अर्चना रामटेके यांनी सांगितले. प्रभाग संघाला ३३८ बचत गट संलग्न असून, ३ हजार ७३१ महिलांचा सहभाग असल्याचे तालुका व्यवस्थापन कक्षाच्या रिता दडमल यांनी सांगितले.

Web Title: Construction of Nutrition Kitchen Garden on behalf of Swaraj Ward Sangh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.