बांधकाम कामगारांना दोन टप्प्यात मिळणार मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2020 05:00 AM2020-04-18T05:00:00+5:302020-04-18T05:00:10+5:30
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाउन करण्यात आले. परिणामी सर्वच उद्योग धंदे आणि रोजगाराची साधने पूर्णपणे ठप्प पडली आहे. आ. विनोद अग्रवाल यांनी अशा काळात गंभीर चिंता व्यक्त करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहून महाराष्ट्रातील सरकारच्या नोंदणीकृत बांधकाम कामगारांकडे लक्ष केंद्रित केले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : लॉकडाउनचा सर्वाधिक फटका सर्वच क्षेत्रातील कामगारांना बसला आहे. रोजगाराअभावी त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीचे संकट ओढावले आहे. त्यामुळे बांधकाम कामगारांना ५ हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याची मागणी आ. विनोद अग्रवाल यांनी शासनाकडे केली होती. त्याचीच दखल घेत बांधकाम कामगारांना दोन टप्प्यात मदत देण्याचे आश्वासन राज्य सरकारने दिले आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाउन करण्यात आले. परिणामी सर्वच उद्योग धंदे आणि रोजगाराची साधने पूर्णपणे ठप्प पडली आहे. आ. विनोद अग्रवाल यांनी अशा काळात गंभीर चिंता व्यक्त करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहून महाराष्ट्रातील सरकारच्या नोंदणीकृत बांधकाम कामगारांकडे लक्ष केंद्रित केले होते. बांधकाम महामंडळाकडे जमा झालेल्या ९ हजार कोटी रुपयांच्या निधीतून प्रत्येक बांधकाम कामगारांच्या खात्यात ५ हजार रुपये आर्थिक रक्कम देऊन सरकारने महाराष्ट्रातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना दिलासा द्यावा अशी मागणी केली होती. बांधकाम कामगारांच्या या गंभीर या गंभीर विषयावर शासनाने त्वरित लक्ष केंद्रीत करीत यावर निर्णय घेतला आहे. लवकरच प्रत्येक नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या बँक खात्यात दोन टप्प्यात अडीच-अडीच हजार रुपयांची आर्थिक रक्कम देऊन त्यांना मदत केली जाईल. याचा जिल्ह्यातील ८५ हजार नोंदणीकृत बांधकाम कामगारांना सरकारकडून मदत होईल.