डाकसेवकांचा बेमुदत संप सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 12:33 AM2018-05-23T00:33:56+5:302018-05-23T00:33:56+5:30
आॅल इंडिया ग्रामीण डाकसेवक संघटना व नॅशनल युनियन आॅफ ग्रामीण डाकसेवक संघटनेच्या संयुक्त कृती समितीच्या वतीने आपल्या विविध मागण्यांना घेवून सोमवारपासून (दि.२२) बेमुदत देशव्यापी संप पुकारण्यात आला आहे. यात जिल्ह्यातील १२०० कर्मचारी सहभागी झाले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : आॅल इंडिया ग्रामीण डाकसेवक संघटना व नॅशनल युनियन आॅफ ग्रामीण डाकसेवक संघटनेच्या संयुक्त कृती समितीच्या वतीने आपल्या विविध मागण्यांना घेवून सोमवारपासून (दि.२२) बेमुदत देशव्यापी संप पुकारण्यात आला आहे. यात जिल्ह्यातील १२०० कर्मचारी सहभागी झाले आहेत.
अखिल भारतीय ग्रामीण डाकसेवक संघटनेमार्फत एस.एस. महादेवय्या यांच्या नेतृत्वात डाकसेवकांच्या हक्कासाठी अनेक आंदोलन करण्यात आले. पे कमिशन व बोनससाठी केलेला संघर्ष यशस्वी झाला. परंतु सातव्या वेतन आयोगाच्या कमलेशचंद्र कमिटीच्या रिपोर्टसाठीसुद्धा सात दिवसांचा संप करण्यात आला. त्यानंतर १५ मार्च २०१८ रोजी पंतप्रधानांच्या घरासमोर सात हजार कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन केले होते. मात्र यानंतरही शासनाने डाकसेवकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले.
त्यामुळे मिळून संघर्ष करण्यासाठी महादेवय्या यांनी इतर संघटनांसह विचारविनिमय केला. अखेर आॅल इंडिया ग्रामीण डाकसेवक संघटना व एफएनओ एनयूपी-३ च्या कार्यालयात जीडीएस जेसीए तयार करण्यासाठी डी. किसनराव व महादेवय्या व बी.व्ही.राव यांची सहमती घेवून समिती तयार करण्यात आली. मंगळवारपासून (दि.२२) संपावर जाण्यासाठी ३ मे २०१८ रोजी शासनाला नोटीस देण्यात आले. त्यानुसार सर्वांनी संपात सहभागी व्हावे, असे ठरवून संयुक्त कृती समितीच्या वतीने संप पुकारण्यात आला.जीडीएस कमिटीच्या (कमलेश चंद्रा) सर्व सकारात्मक शिफारसी त्वरित लागू करण्यात यावे, ही प्रमुख मागणी सदर संघटनांच्या कृती समितीने केली आहे.
डाकसेवा प्रभावित
डाकसेवकच संपावर गेल्यामुळे डाकसेवा प्रभावित झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे डाकविषयक व्यवहार ठप्प पडले आहे. ग्रामीण भागात विविध कामे डाकघरातून केली जातात. ती पुरती प्रभावित झाल्याची माहिती आहे.
ग्रामीण डाकसेवकांचा बेमुदत संप
लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा : आॅल इंडिया ग्रामीण डाकसेवक संघटना व नॅशनल युनियन आॅफ ग्रामीण डाकसेवक संघटना यांच्या संयुक्त कृती समितीच्या वतीने सोमवार (दि.२२) पासून बेमुदत संप पुकारला आहे. यात सालेकसा तालुक्यातील सर्व डाकसेवक (जीडीएस) हे सुध्दा सहभागी झाले होते. त्यामुळे पोस्टाचे कामकाज पूर्णपणे खोळंबले होते. सालेकसा तालुक्यातील सरोजकुमार बोचपे पाऊलदौना, राजकुमार कुर्वे तिरखेडी, अक्षय लिल्हारे कावराबांध, एस.बी.टेंभुर्णीकर धानोली, टी.डी.ढेकवार लटोरी, एस.सी.मस्करे लटोरी, एच.सी.मच्छिरके सोनपुरी, एस.एन.येडे दरेकसा, अरविंद तांडेकर लोहारा, एम.एम.शहारे सालेकसा, एस.के.बहेकार सालेकसा, सारीका डिब्बे पिपरिया, आरजू शेंडे कावराबांध, विजय बालापुरे आदी सहभागी झाले होते.