आदिवासी समाजावर सातत्याने अन्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2018 09:19 PM2018-05-06T21:19:02+5:302018-05-06T21:19:02+5:30

अर्जुनी-मोरगाव परिसरातून वनआंदोलन सुरू करण्यात आले. हे केवळ वनआंदोलन नसून जीवनाचे आंदोलन होते. मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांच्या आंदोलनाची व शोषित, पीडित, आदिवासी समाजाची कधीच दखल घेतली नाही.

Continuous injustice on tribal communities | आदिवासी समाजावर सातत्याने अन्याय

आदिवासी समाजावर सातत्याने अन्याय

Next
ठळक मुद्देनाना पटोले : हलबा-हलबी सामूहिक विवाह सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्क
बाराभाटी : अर्जुनी-मोरगाव परिसरातून वनआंदोलन सुरू करण्यात आले. हे केवळ वनआंदोलन नसून जीवनाचे आंदोलन होते. मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांच्या आंदोलनाची व शोषित, पीडित, आदिवासी समाजाची कधीच दखल घेतली नाही. जन्मापासून मृत्यूपर्यंत हा समाज अन्यायच सहन करीत आहे. लढा लढतच आहे. पण शासनाकडून नेहमीच दुर्लक्ष केले जाते, असे प्रतिपादन माजी खासदार नाना पटोले यांनी केले.
कुंभिटोला-बाराभाटी येथे हलबा-हलबी सामूहिक विवाह सोहळ्यात अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या सामुहिक विवाह सोहळ््याचे उद्घाटन पालकमंत्री तथा सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रामुख्याने अमरावतीचे इंजि. बी.टी. राऊत, सेवानिवृत्त पोलीस आयुक्त बी.के. गावराने, माजी आ. रामरतन राऊत, मीना राऊत, डॉ. नामदेव किरसान, श्रावण राणा, डॉ. देवकुमार राऊत, गिरीश पालीवाल, तहसीलदार सी.आर. भंडारी, राजेश नंदागवळी, शेषराव कोरेटी, मनोहर चंद्रिकापुरे, अजय कोठेवार, किशन मानकर, वाय.सी. भोयर, प्रशांत भस्मे, लक्ष्मीकांत धानगाये, किशोर तरोणे, सुरेखा नाईक, पद्मा राठोड, महेंद्र जुगणाके, रत्नदीप दहिवले, अनिल दहिवले, करूणा नांदगावे आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना पटोले यांनी, शासनाने योजना काढल्या, पण रितसर राबविल्या नाही. सामाजिक न्याय व सलोखा राखण्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेत नमूद केले. पण तो अधिकार, तो न्याय कधीच आदीवासी समाजाला मिळत नाही. हीच परिस्थिती देशासह राज्यात आहे. अनेक विभागात भ्रष्टाचार सुरू आहेत, पण शासनाचे लक्ष नाही, असे सांगीतले.
तसेच या वेळी ना. राजकुमार बडोले, चंद्रिकापुरे, दहिवले, श्रावण राणा, राजेश नंदागवळी, गिरीश पालीवाल, रामरतन राऊत, डॉ. नामदेव किरसान, सहेषराम कोरेटी यांनी सुद्धा मार्गदर्शन केले.
प्रास्ताविक तानेश ताराम यांनी मांडले. संचालन करून आभार मोहन औरासे यांनी मानले. कार्यक्रमासाठी तुलाराम मारगाये, श्यामलाल चर्जे, नरहरी ताराम, रामू औरासे, वासुदेव औरासे, लिलाधर ताराम, हरिभाऊ नाईक, बब्बू भंडारी, मोहन नाईक, प्रधान यांच्यासह समाजबांधवांनी सहकार्य केले.
सामूहिक विवाह सोहळ्याचे २० वे वर्ष
सदर सामूहिक विवाह सोहळ्याचे हे २० वर्ष आहे. कुंभिटोला-बाराभाटी येथील हलबा-हलबी समाज संघटनेच्या शाखेने सदर सोहळ्याचे आयोजन करून २० वर्षांपासूनची ही परंपरा कायम ठेवली आहे. त्यामुळे यात विवाहबद्ध होणाऱ्या जोडप्यांना शासनाने आर्थिक मदत द्यावी, वैवाहिक सोयीसुविधांचा लाभ द्यावा, अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
२७ जोडपी परिणयबद्ध
सुरूवातीला आदिवासींच्या दैवतांचे पूजन व दीप प्रज्ज्वलन करण्यात आले. वर-वधूंचा परिचय करून देण्यात आला. काही चिमुकल्यांनी गोंडी नृत्य सादर केले. संगीत रजनी कार्यक्रम घेण्यात आला. अशा मनोरम वातावरणात २७ जोडपी परिणयबद्ध झाली. त्यांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, पुष्पगुच्छ देण्यात आले.

Web Title: Continuous injustice on tribal communities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.