शिक्षण ही न संपणारी अखंड प्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 11:31 PM2019-01-17T23:31:42+5:302019-01-17T23:32:41+5:30
प्रत्येक मानवाची आई ही त्याची पहिली गुरु असते तर शिक्षक हे दुसरे गुरु, आपला मुलगा शिवाजी व्हावा असे प्रत्येक आईला वाटते, परंतु त्यासाठी आईनेही जिजाऊ बनणे गरजेचे आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अर्जुनी-मोरगाव : प्रत्येक मानवाची आई ही त्याची पहिली गुरु असते तर शिक्षक हे दुसरे गुरु, आपला मुलगा शिवाजी व्हावा असे प्रत्येक आईला वाटते, परंतु त्यासाठी आईनेही जिजाऊ बनणे गरजेचे आहे. वेळेचे नियोजन करावे, शिक्षण ही न संपणारी अखंड प्रक्रिया आहे,असे उद्गार अमरावती येथील राष्ट्रीय व्यक्तिमत्त्व विकास प्रशिक्षक अनिल राठी यांनी व्यक्त केले.
सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, प्राथमिक शाळा, जीएमबी इंग्लीश मिडीयम हायस्कूल व एसडीसी कॉन्व्हेंटच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वार्षिकोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
याप्रसंगी व्यासपीठावर उद्घाटिका डॉ. सोनल चांडक, किरण रापतवार, अध्यक्ष डॉ. वल्लभदास भुतडा, संस्था सचिव तथा प्राचार्य अनिलकुमार मंत्री, पर्यवेक्षिका वीणा नानोटी, मुख्याध्यापक हरिदास गहाणे, मुकेश शेंडे, सुनिता डांगे, सरीता शुक्ला, संयोजक कुंडलिक लोथे, प्रा. इंद्रनिल काशिवार, विष्णू चाचेरे,विद्यार्थी प्रतिनिधी गौरांग खोटेले, सलोनी बघेले उपस्थित होते. देवी सरस्वतीचे पूजन व दीप प्रज्वलन करुन वार्षिकोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. प्रास्ताविक प्राचार्य अनिल मंत्री यांनी तर शालेय प्रगतीचा अहवाल वाचन पर्यवेक्षिका वीना नानोटी यांनी केले. परिचय संयोजक कुंडलिक लोथे यांनी करुन दिला. या वेळी मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थी जयंत लोणारे, दिव्यानी शहारे, अवंती राऊत, आशिष कापगते, सलोनी पालीवाल, अनुष्का ब्राम्हणकर, प्रशिक शहारे, अनघा पिल्लेवार, कलाध्यापक रुपराम धकाते यांचा सत्कार करण्यात आला. विविध हस्तलिखिताचे प्रकाशन करण्यात आले.
कलाध्यापक रुपराम धकाते यांनी संस्थाध्यक्ष घनश्यामदास भुतडा यांची प्रतिमा शाळेला भेट दिली. सुशिलादेवी भुतडा, पुष्पा भैय्या, डॉ.वल्लभदास भुतडा यांनी ती स्विकारली. संस्थेतर्फे अतिथींचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांनी अधिकाधिक प्रगती करुन यशाचे शिखर गाठावे असे डॉ. वल्लभदास भुतडा यांनी सांगीतले. या वेळी मान्यवरांच्या हस्ते विविध प्रदर्शनीचे उद्घाटन करण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन संजयकुमार बंगळे व अर्चना गुुरुनुले यांनी केले तर आभार विष्णू चाचेरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यानी परिश्रम घेतले.