सौरकंदील दुरूस्तीसाठी कंत्राटदाराचा खटाटोप
By admin | Published: July 27, 2014 12:10 AM2014-07-27T00:10:56+5:302014-07-27T00:10:56+5:30
जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाअंतर्गत आदिवासी उपाययोजना, सर्व साधारण योजना व विशेष घटक योजनेतील लाभार्थ्यांना सौर कंदील वाटप करण्यासाठी पुरवठादारांकडून सौर कंदील
सौरकंदील खरेदी : सभापती म्हणतात घोळ नाही
गोंदिया : जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाअंतर्गत आदिवासी उपाययोजना, सर्व साधारण योजना व विशेष घटक योजनेतील लाभार्थ्यांना सौर कंदील वाटप करण्यासाठी पुरवठादारांकडून सौर कंदील खरेदी करण्यात आले. परंतू पुरवठादाराने बंद सौर कंदीलांचा पुरवठा केला. यात आता बंद कंदीलांच्या दुरूस्तीसाठी विभागाकडून कंत्राटदाराच्या माध्यमातून खटाटोप सुरू आहे.
जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागांतर्गत शासन योजनेंतर्गत योजनांचा लाभ देण्यासाठी विविध योजना कार्यान्वीत करण्यात येत आहेत. परंतु या योजनांचा लाभ खऱ्या अर्थाने लाभार्र्थ्यापर्यंत पोहोचतच नाही. योजनांवर असलेला खर्च स्वत:च्या घश्यात उतरविण्यासाठी अधिकारी तत्पर दिसतात. त्यामुळे योजना लाभार्थ्याना पूर्णपणे मिळत नाहीत.
जिल्हा परिषद गोंदिया अंतर्गत शासन योजनेंतर्गत लाभार्थ्याना सौर कंदील ९० टक्के अनुदानावर देण्याची योजना आहे. याच योजनेंतर्गत महिला व बालकल्याण विभागाने दोन पुरवठाधारकांना सौर कंदील पुरवठ्याची मागणी नोंदविली. यापैकी निर्मल पावर या पुरवठा कंपनीने बंद सौर कंदील विभागाला पुरवठा केला. त्यामुळे बंद कंदील लाभार्थ्याच्या माथ्यावर मारण्याचा र्प्रयत्न अयशस्वी झाला. लाभार्थ्यान मिळालेल्या बंद कंदीलाची तक्रार विभागाला केल्यावर हा प्रकार समोर आला. परंतू यात कोणताही घोळ झालेला नाही. शासकीय दरानुसारच खरेदी झालेली असल्याचे महिला व बालकल्याण सभापती सविता पुराम यांनी पत्रकारांना सांगितले. यात घोळ झाल्याचे भासवत आपली राजकीय बदनामी करण्याचा प्रयत्न काही लोक करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला. सदर कंदील पुरवठादाराकडे ५ वर्षासाठी मेन्टेनन्स आहे. त्यामुळे कंदीलात काहीही बिघाड झाला तरी तो दुरूस्ती करण्याची जबाबदारी त्याची असल्याचे त्यांनी सांगितले. वास्तविक खरेदी केल्यानंतर आचारसंहितेमुळे हे कंदील बंद होते. म्हणून त्याचे सेल उतरले असेही पुराम यांनी सांगितले.
जिल्हा परिषदने ९ प्रकल्प अंतर्गत ३६४ सौर कंदीलांसाठी पुरवठाधारकांना ११ लाख ७९ हजार ९२० रुपयांचे देयक मंजूर केले.