योजनेचे काम मर्जीच्या कंत्राटदारास
By admin | Published: May 17, 2017 12:19 AM2017-05-17T00:19:19+5:302017-05-17T00:19:19+5:30
ग्राम ढाकणी येथील सरपंच व सचिवांनी गावात आपला मनमर्जी कारभार चालविला आहे.
ढाकणीच्या सरपंच व सचिवाची मनमानी : जिल्हाधकाऱ्यांकडे कारवाईची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : ग्राम ढाकणी येथील सरपंच व सचिवांनी गावात आपला मनमर्जी कारभार चालविला आहे. स्वहितासाठी त्यांनी ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता पाणी पुरवठा योजनेचे काम मर्जीतील कंत्राटदरास दिले आहे. त्यामुळे या योजनेचे काम रद्द करून पुन्हा निविदा मागविण्यात यावी अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य पद्मा मेश्राम यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन केली आहे.
ग्रामपंचायत सदस्य मेश्राम यांच्या पत्रकानुसार, ढाकणी येथील सरपंच प्रिती प्रितम मेश्राम व सचिव पटले यांनी ७ मे रोजी सभेत एक कोटी १५ लाख रूपयांच्या पाणी पुरवठा योजनेसाठीच्या बंद निविदा उघडल्या नाहीत. तसेच उपस्थितांची सन्मती घेतली नाही व आपल्याच मनाने पाणी पुरवठ्याचा ठराव घेत आर.पी.राऊत कंस्ट्रक्शन कंपनीला काम दिले. प्रोसिडींगची दुय्यम प्रत मिळाल्यावर हा प्रकार उघडकीस आला. एवढेच नव्हे तर सरपंच व सचिवांनी पाणी पुरवठा योजनेसाठी निविदासाठी जाहीरात कोणत्या समाचार पत्रात दिली याबद्दलही कुणाला माहिती दिली नाही. तसेच राज्य व केंद्र शासनाच्या परिपत्रकानुसार त्यांनी पाणी पुरवठा व स्वच्छता समितीची नेमणूक केली नाही. तर समितीत आपल्या मर्जीतील सदस्यांची नेमणूक केली आहे. यावरून या योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे स्पष्ट होते. त्यात १७ तारखेला योजनेचे भमिपूजन असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी नियमबाह्यरीत्या घेण्यात आलेला ठराव रद्द करून नियमानुसार पुन्हा निविदा मागवावी अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य मेश्राम यांनी केली आहे.