रक्त संकलनात एनएसएस व एनसीसीचे योगदान ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:38 AM2021-06-16T04:38:19+5:302021-06-16T04:38:19+5:30

राज्यभर कोरोनाचा उद्रेक असताना लॉकडाऊन व जमावबंदी यामुळे रक्तदान शिबिरांवरील निर्बध वाढले व याचा फटका रक्तदानालाही बसला. मात्र अशाही ...

Contribution of NSS and NCC in blood collection () | रक्त संकलनात एनएसएस व एनसीसीचे योगदान ()

रक्त संकलनात एनएसएस व एनसीसीचे योगदान ()

Next

राज्यभर कोरोनाचा उद्रेक असताना लॉकडाऊन व जमावबंदी यामुळे रक्तदान शिबिरांवरील निर्बध वाढले व याचा फटका रक्तदानालाही बसला. मात्र अशाही परिस्थितीत येथील दिशा संस्थेचे वरिष्ठ चिकित्सक डॉ. देवाशीष चॅटर्जी यांच्या आवाहनावरुन गोंदिया शिक्षण संस्थेचे युवा संचालक निखिल जैन व प्राचार्य शारदा महाजन यांच्या सूचनेवरून रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात रासेयो प्रमुख प्रा. बबन मेश्राम व एनसीसी प्रमुख डाॅ.एच.पी पारधी यांच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांनी रक्त संकलनात योगदान दिले. शिबिरासाठी एमबीए. विभाग प्रमुख गिरीश कुदळे, आरजू राऊत, योगेश जोशी, शेखर नागपुरे, आनंद गौतम, जागृत सेलोकर, चाहत मेश्राम, प्रदीप कावरे, दीपक दास, अभय येटरे, लोकेश फुंडे, विशाल बावनथडे, विशाल खरे, समीर गडपायले, राहुल मेश्राम, ओम ठाकरे, आचल हुड, देवेश्री मेश्राम, दामिनी कटरे, प्रीती तिघरे यांनी सहकार्य केले.

Web Title: Contribution of NSS and NCC in blood collection ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.