भाडीपारची स्थिती नियंत्रणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2016 12:32 AM2016-09-20T00:32:04+5:302016-09-20T00:32:04+5:30

भाडीपार येथील तापाच्या साथीवर नियंत्रण मिळविण्यात आरोग्य विभागाला यश आले आहे. डेंग्युसदृश

Controlling the situation with the rent | भाडीपारची स्थिती नियंत्रणात

भाडीपारची स्थिती नियंत्रणात

Next

‘तो’ ताप डेंग्युचा नाही : दूषित पाण्याचा परिणाम, रूग्णसंख्या १८ वर
सालेकसा : भाडीपार येथील तापाच्या साथीवर नियंत्रण मिळविण्यात आरोग्य विभागाला यश आले आहे. डेंग्युसदृश तापामुळे दोघांचे मृत्यू झाल्याने दहशत पसरली होती. परंतू दूषित पाण्याने तापाची साथ पसरल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने गावात तीटकनाशक फवारणी व पाण्यात जंतनाशक औषधी टाकण्यात आले आहे.
भाडीपार येथे अज्ञात आजारामुळे एका १६ वर्षीय मुलासह ५६ वर्षीय महिलेचा जीव गेला. शिवाय गावातील अन्य काही लोकांना ताप आला. यामुळे डेंग्यूच्या भितीत गावकरी वावरत होते. शिवाय चार रूग्णांना गोंदियाच्या केटीएस रूग्णालयात व अन्य काहींना येथील ग्रामीण रूग्णालयात भर्ती करावे लागले होते. याचे गांभीर्य लक्षात घेत सातगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी आपल्या पथकासह गावात दाखल झाले. त्यांनी गावातील २७० लोकांची आरोग्य तपासणी करून ९० लोकांचे रक्तनमूने घेत तपासणीसाठी पाठविले आहेत. शिवाय त्यांच्यावर औषधोपचार सुरू असल्याने स्थिती नियंत्रणात आली आहे. त्यातच ग्रामीण रूग्णालयात डॉ. संदीप खोब्रागडे यांनी ९४ रूग्णांची तपासणी करीत उपचार केला.
यात ११ रूग्ण भरतीे असतानाच आणखी तिघांना दाखल करण्यात आले. गोंदियातील केटीएस रूग्णालयात चार रूग्ण भरती असून रुग्णसंख्या १८ झाली आहे.

पाणी शुद्धीकरणासाठी धावपळ
४सातगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. जे.डी.चाटे यांना विचारणा केली असता, गावकऱ्यांनी दूषीत पाण्याचा वापर केल्याने तसेच गावात घाण वाढल्यामुळे तापाची साथ पसरली असल्याचे त्यांनी सांगीतले. यावर पूर्ण गावात किटकनाशक व औषधांची फवारणी करण्यात आली. तसेच पाण्याला शुद्ध करण्यासाठी विहीर व बोअरवेलमध्ये जंतनाशक औषधी टाकण्यात आली आहे. त्यामुळे आजाराची लागण थांबली आहे. तरीही आरोग्य कर्मचारी गावात सतत लोकांच्या आरोग्याची तपासणी करीत आहेत. कुणालाही ताप, डोकेदुखी, पोट दुखी झाल्यास त्वरीत औषधोपचार दिला जात असल्याचे सांगीतले.

खासदार व आमदारांनी दिली गावाला भेट
४या प्रकरणाची माहिती मिळताच खासदार अशोक नेते व आमदार संजय पुराम यांनी गावाला भेट दिली. या भेटीत त्यांनी मृतांच्या घरी भेट देत कुटूंबीयांना धीर दिला. तसेच गावातील परिस्थितीबाबत आरोग्य विभागाकडून जाणून घेत योग्य ते पाऊल उचलण्यास सांगीतले. त्याचप्रकारे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. श्यामसुंदर निमगडे यांनीही भेट देत परिस्थिती जाणून घेतली.

Web Title: Controlling the situation with the rent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.